Animal Care : जनावरांमध्ये खनिजांची कमतरता होण्याची प्रमुख कारणे

जमिनीत वर्षानुवर्षे तीच पिके मोठ्या कालावधीसाठी घेतल्याने जमिनीची उत्पादकता कमी होते. अशा जमिनीत पिकं घेतल्याने जमिनीतील उरली सुरलेली मुलद्र्व्येच चाऱ्यात येतात.
Reasons Of Mineral Deficiency In Animals
Reasons Of Mineral Deficiency In Animalsagrowon
Published on
Updated on

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पशुखाद्य, पाणी याबरोबर जनावरांना खनिज मिश्रणांचीही आवश्यकता असते. जमिनीत वर्षानुवर्षे तीच पिके मोठ्या कालावधीसाठी घेतल्याने जमिनीची उत्पादकता कमी होते. अशा जमिनीत पिकं घेतल्याने जमिनीतील उरली सुरलेली मुलद्र्व्येच चाऱ्यात येतात. शरीरात खनिज मिश्रणाचा अभाव झाल्यास जनावरे अशक्त होतात. जेवढ जास्त उत्पादन तेवढी जास्त अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेतली जातात. जनावरांमध्ये खनिजांची कमतरता दिसण्याची प्रमुख कारणे

  • जमिनीमध्ये सतत एकाच पीकाच उत्पादन घेतल्यानं जमिनीतील खनिजे हळूहळू नाहीशी होऊ लागतात.

  • सुधारित चारा पिकांच्या जाती वापरल्यानं जास्त उत्पादन मिळते. पण त्यावेळी भरपूर अन्नद्रव्ये जमिनीतून घेतले जाऊन पुढील पिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम दिसून येतो.

  • सतत जनावरांना ऊस, उसाचे वाडे, कडवळ खाऊ घातल्याने यामाध्यमातून खनिज मिश्रणे जनावरांना उपलब्ध होत नाहीत.

  • बरेचदा पशुपालक शेतकरी दूध उत्पादन चांगले मिळायला लागले की जनावरांच्या ग्रहण क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात हिरवा चारा खायला देतात, त्यावेळी जनावरांमध्ये खनिज मिश्रणाची कमतरता जाणवते.

खनिज मिश्रणाच्या कमतरतेची लक्षणे

  • वासरांची जलद गतीने वाढ होत नाही. शरीरावरील केस उभे राहतात व त्वचा खडबडीत होऊन त्वचेचे आजार वाढतात.

  • शरीरात खनिजांची कमतरता झाल्यानं जनावर पान्हा चोरते, दूध देत नाही तसेच लवकर आटते जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन डोळ्यातून पाणी गळते.

  • जनावरांचा भाकड कालावधी वाढतो. एका वर्षात एक वेळेत मिळत नाही. गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते तसेच तात्पुरते किंवा कायमचे वांझपणा येते.

  • जनावरे माज वेळेवर दाखवत नाहीत. तसेच माजाचा कालावधी कमी जास्त होतो. गाय किंवा म्हैस विताना वासरू अडकण्याचा संभव असतो. तसेच व्यायल्यानंतर वार लवकर पडत नाही अडकून राहते.

  • नवजात वासरांचे वजन कमी भरते तसेच अपूर्ण दिवसाचे वासरू जन्माला येते.

  • जनावरांची पायाची हाडे,खूर, शिंगे, अपघात प्रसंगी किंवा जोरात धडक दिली यात मोडतात.

जनावरांना खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बरीच जनावरे चप्पल, पिशव्या, गब्बर इत्यादी अखाद्य वस्तू खातात त्यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊन जनावर फुगते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com