Village Development: ग्रामीण विकासामध्ये पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रमाचे अभ्यासकेंद्र ठरले आहे. आता मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने जनावरांचे स्नानगृह (ब्युटी पार्लर) चालू करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जनावरांमुळे होणारे नदी, ओढ्यातील प्रदूषण थांबवण्यासाठी हा उपक्रम चालू केल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. या ब्युटी पार्लरची सर्वत्र चर्चा आहे. .शासनाच्या माध्यमातून घनकचरा, सांडपाण्यावर मोठी यंत्रणा राबवली जाते. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे असलेल्या पाळीव जनावरांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणावर अपेक्षित काम होत नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात असलेल्या पाळीव जनावरांच्या स्नानगृहाची उभारणी केली आहे. सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त असलेल्या या स्नानगृहामध्ये जनावरांच्या अंघोळीसाठी शॉवर बसवले आहेत..Nannaj Sanctuary: नान्नज अभयारण्यात १५ पाणवठे.जनावरांच्या अंघोळीनंतर निघणाऱ्या प्रदूषित पाण्यावरही प्रक्रिया करून परसबागेत सोडण्यात आले आहे. उर्वरित पाण्यासाठी शोषखड्ड्याची व्यवस्था केली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच रवींद्र माने, सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, मनीषा माने, लता आसळकर, निर्मला पाचुपते, सीमा माने, दादासाहेब माने, अधिकराव माने, विठ्ठल माने, अनिल चव्हाण, सार्थक झांजगे आदींची उपस्थिती होती..Narnala Festival: नरनाळा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’ .प्रदूषणाला आळा..गावातील पाळीव जनावरांच्या माध्यमातून गावानजीकच्या नदी आणि ओढ्यातील पाण्याचे होणारे प्रदूषण टाळता येईल. नेहमीच शासनाकडून सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपक्रम राबविले जातात. मात्र, या उपक्रमामुळे प्रदूषणाला आळा बसेल..मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने हा अनोखा उपक्रम राबविला आहे. गावातील नागरिकांबरोबरच येथील जनावरांच्या आरोग्याची काळजी ग्रामपंचायतीने घेतली आहे. आमच्या म्हशी, गायी, बैल आणि सर्वच जनावरांना आता शॉवरने अंघोळीचा आनंद मिळणार आहे. आता गायी, म्हशींचे आरोग्य तर निरोगी राहीलच.- अधिकराव माने, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.