Agriculture Electricity : शेतीपंपांला आठऐवजी पाचच तास वीजपुरवठा

Agriculture Pump Electricity : शेतीपंपाला आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले तरी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
Farmers Protest
Farmers Protest Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : शेतीपंपाला आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले तरी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कळंब तालुक्यातील ईटकूरसह आथर्डी, अडसूळवाडी व खोंदला शिवारातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाला केवळ पाच ते सहा तासच वीज मिळत आहे. त्यातही ही वीज सातत्याने खंडित होते.

रब्बीचे पिके जगविताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी (ता. २२) कळंब येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाला कुलूप लाऊन कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून सुरळीत वीज पुरवठ्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

पंधरा दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्यासोबत भोगजी येथील वीज उपकेंद्रातील ऑपरेटर धुमाळ यांची जूनमध्ये बदली करण्याची हमी प्रभारी कार्यकारी अभियंता निलंबरी कुलकर्णी यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. इटकूर, अडसूळवाडी, खोंदला, अथर्डी गावातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाला सहा तास वीजपुरवठा करण्यात येतो. सहा तासही सुरळीत वीजपुरवठा होत नाही.

Farmers Protest
Agricultural Electricity : ट्रान्सफॅार्मर मंजूर होऊनही बसवला नाही, शेतकऱ्यांची पिके जळू लागली

त्यामुळे पाणी असूनही उन्हाळी पिकावर नांगर फिरवीण्याची वेळ आली आहे. इतर गावांतील शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र वरील गावातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आठ तास वीजपुरवठा का होत नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पाणी असूनही केवळ विजेमुळे शेतातील उभी पिके वाळून जात आहेत.

Farmers Protest
Agriculture Electricity Crisis : विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

मात्र वीज कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. इटकूर साठी ३३ केव्ही वीज उपकेंद्र कार्यान्वित आहे. पूर्वी गावठाणचा वीजपुरवठा हा पहाटे पाच ते नऊ खंडित होता. आता पहाटे पाच सकाळी अकरा वाजेपर्यंत खंडित करण्यात येत आहे.

यामुळेच चिडलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय गाठून कार्यालयाला कुलूप लावले. शिराढोणचे सहायक अभियंता गित्ते यांनी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्यासोबत दूरध्वनीवरुन संवाद करून दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पंधरा दिवसात वीजपुरवठा सुरळीत न केल्यास रोको आंदोलन करण्याचा इशारा बंडू गंभिरे, प्रदीप फरताडे, बाळासाहेब गंभीरे व शेतकऱ्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com