Anganwadi Workers : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अडवला महामार्ग, उद्यापासून नेत्यांच्या दारात मांडणार ठिय्या

Anganwadi Workers Strike : महामार्गावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे १०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Anganwadi Workers
Anganwadi Workersagrowon

Anganwadi Workers Highway : मागच्या दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान मागच्या ४ दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी आक्रमक होत महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला होता. यावर ५०० हून अधिक महिलांनी तावडे हॉटेल परिसरात एकत्र येत जोरदार आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

कडाक्याच्या उन्हात अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येने तब्बल एक तास रस्त्यावर ठिय्या मारल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली होती.

महामार्गावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे १०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत चौकातील सर्व रस्ते रोखून धरले. तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला. यानंतर काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. यामध्ये पोलीस आणि सेविकांमध्ये झटापटीचेही प्रसंग घडले.

दरम्यान, सरकार मागण्यांकडे दूर्लक्ष करीत असल्याने उद्या (ता.२३) बुधवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा, यावेळी संघाचे अतुल दिघे यांनी जाहीर केले.

Anganwadi Workers
Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या उर्वरित मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय

महामार्ग रोको आंदोलनासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून सेविका, मदतनीस सकाळी दहापासूनच तावडे हॉटेल चौकात येत राहिल्या. दुपारी बारा वाजता हायवे रोखण्यासाठी सेविका जावू लागल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यामुळे आक्रमक सेविका, मदतनीसनी चौकात ठिय्या मारला. सर्व रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. कडाक्याचे उन डोक्यावर झेलत त्यांनी रस्ता रोखला.

पोलिसांनी थोडा बळाचा वापर करून रस्ता खुला केला. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. आंदोलनात धोडींबा कुंभार, छाया तिप्पट यांच्यासह सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com