Mumbai Mantralaya : काम होत नसल्याच्या संतापाने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

Mantralaya News : एका वृद्धाने येथील पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. तर तेथेच बसून आपली व्यथा सरकारी अधिकाऱ्यांना सांगताना आपले काम होत नसल्याने संताप व्यक्त केला.
Mumbai Mantralaya
Mumbai MantralayaAgrowon
Published on
Updated on

Pune News : मंत्रालयात मंगळवारी (ता.९) खळबळजनक घटना घडली. एका वृद्धाने येथील पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. तर तेथेच बसून आपली व्यथा सरकारी अधिकाऱ्यांना सांगताना आपले काम होत नसल्याने संताप व्यक्त केला. तर आपण खाली उतरणार नसल्याचं सांगितले. यादरम्यान पोलिसांनी वृद्धाची समजूत काढत असतानाच अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने वृद्धाला वाचवल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. 

अधिवेशनाचे कामकाज सुरू असल्याने मंत्रालयासह विधान भवनात नेत्यांसह सर्वसामान्यांची रेलचेल दिसत आहे. यादरम्यान मंत्रालयाच्या पाचव्या मजल्याच्या खिडकीच्या सज्जावर एका वृद्धाने धाव घेतली. तसेच बाहेरच्या बाजूला बसत खाली उडी मारून आत्महत्या करू अशी चेतावणी दिली. त्यामुळे मंत्रालयात एकच गोंधळ उडाला होता. 

Mumbai Mantralaya
Mumbai Rains Update : कोकणासह मुंबईत पावसाचा हाहाकार; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

या वृद्धाचे नाव अरविंद बंगेरा (वय-५२) असून बोरिवलीमध्ये राहतात. ते वडापावचा व्यवसाय करतात. तर बंगेरा बीएमसीच्या एका अधिकाऱ्याच्या त्रासामुळे त्रासले होते. त्याचीच तक्रार घेऊन ते मंत्रालयात आले होते. मात्र बराच काळ त्याच्या अडचणीकडे कोणीच लक्ष दिले नाही. तर संबंधीत अधिकाऱ्याने आपलं जगणं मुश्किल केल्याचे म्हणत त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.

Mumbai Mantralaya
Mumbai Weather: मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

तर मंत्रालयाच्या इमारतीबाहेरील खिडकीच्या सज्जावर आत्महत्या करण्यासाठी बसलेल्या बंगेरा यांचा पोलिसांनी समजूत घातली. मात्र ते कोणाचेच ऐकत नव्हते. तर वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारूनही आपलं काम होत नसल्याचा राग बंगेरा बोलून दाखवत होते. बराच काळ बंगेरा यांची समजूत काढल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. यावेळी कोणताही अनर्थ घडू नये म्हणून इमारती खाली जाळी लावण्यात आली होती. 

आत्मदहनाचा प्रयत्न

याघटनेआधी मंत्रालयात अशा अनेक घटना आहेत. अनेकांनी मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्रालयात जाळी मारल्याने अनर्थ टळला. तर काही महिन्यांपूर्वीच जनता दलाचे उपाध्यक्ष रमेश मोहिते यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मोहिते यांनी मंत्रालयासमोर स्वत:ला जाळून घेतल्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत, अंपंगांची पेन्शन दीड हजारवरुन तीन हजार करावी अशी मागणी केली होती. तेंव्हा देखील पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com