G7 Summit 2025: अमेरिकेच्या अनुपस्थित उर्वरित देशांचा एकजूट दाखविण्याचा प्रयत्न

Trump Skips G7: कॅनडामधील जी-७ परिषदेला सुरुवात झाली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या आठ तासांत परतीचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिका बाजूला राहताच इतर देशांनी एकजुटीचा प्रयत्न सुरू केला आहे.
Donald Trump
Donald TrumpAgrowon
Published on
Updated on

Canada News: युरोप आणि पश्‍चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (ता. १६) सुरू झालेल्या ‘जी-७’ परिषदेत अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केवळ हजेरी लावून मायदेशी रवाना झाले. त्यामुळे जगातील तणाव कमी करण्याबाबत या परिषदेत होणाऱ्या चर्चेचे महत्त्व कमी झाल्याचे विश्र्लेषकांनी सांगितले. अमेरिकेच्या अनुपस्थित उर्वरित सहा देश एकजूट दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

जी-७ परिषदेसाठी कॅनडात दाखल झाल्यानंतर केवळ आठ तासांतच ट्रम्प हे मायदेशी परतले. इराण आणि इस्राईलमधील संघर्ष वाढल्यानंतर त्यांच्यात युद्धबंदी घडवून आणण्यासाठीच ट्रम्प हे तातडीने अमेरिकेला गेल्याची चर्चा रंगल्यानंतर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना ‘त्यापेक्षाही मोठे कारण’ असल्याचे सांगितले.

Donald Trump
Trump's Decision: हवामान बदल अन् बदलती अमेरिका

मात्र अधिक स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. या परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध आणि इराण-इस्राईल संघर्ष या मुद्द्यांबरोबरच आयातशुल्क धोरणावरही प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे. या तिन्ही मुद्द्यांमध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची असल्याने चर्चेबरोबरच ट्रम्प यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यासही इतर देशांचे प्रमुख उत्सुक होते.

Donald Trump
Donald Trump : अमेरिकी न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना हिसका

मात्र, ट्रम्प हे माघारी गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच चर्चा होणार आहे. गटातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या सदस्य देशांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की आणि ‘नाटो’चे प्रमुख मार्क रुट्टे हे परिषदेत सहभागी होणार आहेत.

युक्रेन मुद्द्यावरून मतभेद

युक्रेनवरील हल्ल्याला जी-७ गटातील अमेरिका वगळता इतर देशांनी रशियालाच दोषी ठरविले असले तरी ट्रम्प यांनी मात्र युक्रेनलाही तितकेच दोषी मानले आहे. ट्रम्प यांनी युक्रेनलाही मदतीचा हात आखडता घेतला आहे. आज परिषदेत ट्रम्प यांनी ‘पुतीन यांना २०१४ मध्ये गटातून काढून टाकले नसते तर हे युद्धच झाले नसते,’ असे बोलून दाखविले. ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लागू करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर मतभेद असल्यानेही ट्रम्प यांनी परिषदेतून निघून जाणे पसंद केल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com