Water Conservation : वास्तुविशारदाची दुर्गम भागात जलसंधारणासाठी धडपड

Water Resources : गावातील जुन्या विहिरी, हातपंपाचे पुनर्भरण व्हावे तसेच जंगलातील झरे पुन्हा जिवंत व्हावेत यासाठी एक तरुण वास्तुविशारद शेतकरी जिद्दीने जलसंधारणाचा उपक्रम राबवत असल्याचे चित्र मुठा खोऱ्यातील पर्वतरांगांमध्ये दिसते आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Pune News : गावातील जुन्या विहिरी, हातपंपाचे पुनर्भरण व्हावे तसेच जंगलातील झरे पुन्हा जिवंत व्हावेत यासाठी एक तरुण वास्तुविशारद शेतकरी जिद्दीने जलसंधारणाचा उपक्रम राबवत असल्याचे चित्र मुठा खोऱ्यातील पर्वतरांगांमध्ये दिसते आहे. वेल्हा तालुक्याच्या पश्‍चिमेतील दुर्गम भागात घोल दाबसरे गावांच्या कुशीतील डोंगररांगेत अनुज कुलकर्णी १८ एकरांची शेती करतात.

तेथील गारजाईवाडीच्या पायथ्याला असलेल्या पाणलोट क्षेत्रात जंगल असूनही पावसाळ्यानंतर पाण्याची टंचाई जाणवते. ‘‘पावसाळ्यानंतर झरे आटतात. त्यामुळे जनावरांचे पाण्याचे हाल होतात. त्यामुळेच डोंगरावर माथ्यावरील माझ्या शेतीत जलसंधारणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात मी पर्यावरणपूरक ४५० झाडे लावली. यात जमिनीची धूप थांबवणारे, पशुपक्ष्यांना उपयुक्त ठरणाऱ्या झाडांचा समावेश आहे,’’ असे अनुज यांनी सांगितले.

Water Conservation
Water Conservation : टंचाईच्या संकटात साठवण क्षमतावाढीसाठी उपाययोजना

बेळगावच्या दड्डी गावात राहणारा हा कुलकर्णी परिवार सैन्यातील नोकरीमुळे पुण्यात स्थलांतरित झाला. अनुज यांचे वडील सैन्यात गॅरिसन इंजिनियर होते. ‘‘आम्हाला दुर्गम भागात शेती घ्यायची होती.

मात्र केवळ मजा म्हणून नव्हे तर पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प माझा होता. त्यामुळेच येथे आता ४८ लाख लिटर क्षमता मोठ्या बंधारा मी बांधला आहे. ३५ फूट उंच, ८० फूट लांब आणि १२५ फूट उंचीचा या बंधाऱ्याचा वापर पाझर तलावासारखा होणार आहे,’’ असे अनुज सांगतात.

बंधाऱ्यात पाणी साचत नसल्यामुळे तळ पुन्हा उकरण्यात आला. त्यात १२ टन सोडिअम बेंटोनेट टाकण्यात आले. या पदार्थामुळे माती धरुन ठेवण्याची क्षमता आहे. त्यानंतर धुमस मारून तेथे जिओ सिंथेटिक नॉन ओव्हेन फॅब्रिक दर्जाचे कापड अंथरण्यात आले. त्यावर माती टाकून पुन्हा बाजूने दगडाची ताल करण्यात आली आहे.

त्यामुळे हळुवार पाणी मुरेल; तसेच डोंगरावरून वाहून येणारी माती, गाळ अडून राहणार आहे. ‘‘मी काँक्रीटचे भव्य शेततळे बांधून माझा स्वार्थ साधला असता. परंतु मी खर्चीक पाझर तलाव बांधला. त्यातून मला ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना गावकऱ्यांसमोर ठेवायची आहे,’’ असे श्री. अनुज अभिमानाने सांगतात.

अनुज यांनी डोंगरात बांधलेले घरदेखील पर्यावरणपूरक आणि आसपासच्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेले आहे. घरातील सांडपाण्यापासून गावाच्या पाणी प्रवाहात इबोला तसेच इतर जीवजंतू पसरू नयेत यासाठी त्यांनी शून्य प्रदूषणावर आधारित सांडपाणी व्यवस्था उभारली आहे. त्यासाठी घराबाहेर सुरक्षा संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेला बायोडायजेस्टर बसवला आहे.

Water Conservation
Water Conservation : भूजल संवर्धनासाठी ३६ गावांचा होणार गौरव

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाळ्यात तुफान वारे वाहते. त्यामुळे घरे पडतात. त्यामुळे श्री.अनुज यांनी ताशी ३०० किलोमीटर प्रतितासाने वाऱ्याच्या वेगाला प्रतिकार करणारे घर बांधले आहे. त्यावर सौर यंत्रणा बसविण्यात आली आहे. घराला लागणारी वीज तेथेच तयार होते. विशेष म्हणजे लोखंडी सांगडा व दगडाचे बांधलेले हे घर आतून मातीचे आहे. सारवलेल्या जमिनीवर कुलकर्णी परिवार वावरतो.

मूळ शेतकऱ्यांना मदत करण्याचा वसा

‘‘काहीही झाले तरी आम्ही बाहेरून येथे शेती विकत घेतलेले शेतकरी आहोत. आमच्यासारख्या लोकांची संख्या सह्याद्रीत वाढते आहे. परंतु लोकांनी मूळ शेतकऱ्यांना मदत करण्याचा वसा घेतला पाहिजे. पर्यावरणाची हानी टाळली पाहिजे. मौजमजेसाठी घरे न बांधता स्थानिक शेतकरी व पशुपक्ष्यांची काळजी घेत शेती केली पाहिजे,’’ अशी भूमिका श्री. अनुज यांनी मांडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com