Budget Maharashtra 2023 : 'मागेल त्याला शेततळे' योजनेचा विस्तार करण्याची अर्थसंकल्पात घोषणा

मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिंबक सिंचन, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह देण्याची घोषणा करण्यात आली.
Budget 2023
Budget 2023Agrowon

Budget Maharashtra - राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे योजनेच्या धर्तीवर आता मागेल त्याला फळबाग, ठिंबक सिंचन आणि शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन शेडर देण्याची घोषणा राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला.

शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरीचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष तरतुदी करण्यात आल्या.

मागेल त्याला शेततळे योजना व्यापक करण्यात आली. तसेच मागेल त्याला शेततळेच्या धर्तीवर विविध योजनांसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

त्यामध्ये मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिंबक सिंचन, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह देण्याची घोषणा करण्यात आली.

तसेच शेती यांत्रिकीकरणामध्ये मागेल त्याला पेरणी यंत्र आणि कॉटन शेडर देण्याची घोषणा करण्यात आली.

राज्यात सिंचनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेती क्षेत्रासाठी सिंचनाचे महत्त्व लक्षात घेऊन शेततळे योजनेचाही विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कोकण नदी जोड प्रकल्पातून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध तरतूदीची घोषणा केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com