Amul Dairy : 'अमूल' बनला जगातील सर्वात मजबूत डेअरी अँड फूड ब्रँड

Dairy Industry : भारतातील सर्वात मोठा डेअरी उत्पादक अमूलचा समावेश जगातील सर्वात मजबूत फूड अँड डेअरी ब्रँडमध्ये समावेश झाला आहे.
Amul Dairy
Amul DairyAgrowon
Published on
Updated on

Indian Dairy Industry : भारतातील सर्वात मोठा डेअरी उत्पादक अमूलचा समावेश जगातील सर्वात मजबूत फूड अँड डेअरी ब्रँडमध्ये समावेश झाला आहे. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स २०२४ च्या अहवालात अमूलला जागतिक स्तरावर सर्वात मजबूत फूड अँड डेअरी ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अमूलने याबाबतची माहिती दिली आहे.

ब्रँड फायनान्सच्या वार्षिक अहवालात जागतिक बाजारात अमूलच्या वाढत्या प्रभावाला अधोरेखित केले आहे. कंपनीच्या ब्रँड स्ट्रेन्थचे मुल्यांकन १०० पैकी ९१.० ब्रँड स्ट्रेन्थ इंडेक्स (BSI) गुणांसह करण्यात आले, ज्यामध्ये AAA+ रेंटींग देण्यात आले आहे.

Amul Dairy
Amul Milk : लोकसभा निकालाआधीच 'अमूल'ने दिला झटका; केली २ रुपयांनी वाढ

टॉप १० कंपन्या

या यादीमध्ये अमूलनंतर चीनच्या दोन कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मेंगनिऊ आणि यिली या दोन चिनी कंपन्या आहेत. सर्वोकृष्ट १० च्या यादीत भारत, व्हियतनाम, सौदी, फिनलँड, आणि डेन्मार्कच्या एक-एक कंपनीचा समावेश आहे. तर चीनच्या दोन आणि फ्रान्सच्या तीन कंपन्यांचा समावेश आहे.

Amul Dairy
Gokul Milk vs Amul Milk : 'गोकुळसमोर अमूलचे आव्हान पण आक्रमण थोपवणार'

डेअरी मार्केटमध्ये अमूलचा दबदबा

डेअरी बाजारात बटर मार्केटमध्ये ८५ टक्के वाटा आहे. तर दुधाच्या मार्केटमध्ये ७५ टक्के आणि पनीर म ६६ टक्के इतका वाटा आहे. असे असेल तरी ब्रँड फायनान्सच्या अहवालात सर्वोकृष्ट १० डेअरी ब्रँडच्या एकूण मुल्यांकनामध्ये ६ टक्क्यांची घट नोंदवली असून ती ४३.८ बिलियन डॉलर आहे.

अमूल ही एक सहकारी दूध संस्था असून हिचा जन्म सहकारच्या चळवळीतून झाला. १९४५ मध्ये गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील इंग्रज सरकारच्या आंदोलन पुकारले होते. त्यानंतर १९४६ मध्ये दोन छोट्या गावांतून दरोरज केवळ २४७ लिटर दुधाचे संकलन करून अमूल सहकारी दूध संघाची सुरूवात झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com