Amaravati APMC : अमरावती बाजार समिती साकारणार टर्मिनल मार्केट

Terminal Market : नागपूर-अकोला राष्ट्रीय महामार्गावर कोंडेश्वरनजीक अमरावती बाजार समितीच्या जागा आरक्षित जागेवर एकत्रित टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार आहे.
Amaravati APMC
Amaravati APMC Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : नागपूर-अकोला राष्ट्रीय महामार्गावर कोंडेश्वरनजीक अमरावती बाजार समितीच्या जागा आरक्षित जागेवर एकत्रित टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार आहे. १२८ एकर जागेवर सुमारे ८०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून विदर्भातील तो एकमेव प्रकल्प राहणार आहे.

सोबतच बाजारशुल्क वाढविणे, बाजार समितीला छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती, असे नामकरण करावे, असेही ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समिती परिसरातील टीएमसी यार्डमध्ये पार पडली.

Amaravati APMC
Amaravati Water Storage : अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांत ६८ टक्के जलसाठा

सभेच्या सुरुवातीला मागील वर्षी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या वेळी सचिव दीपक विजयकर यांनी अहवालाचे वाचन केले. वर्षभरात प्रशासनाने केलेल्या कामांची माहिती सभापती हरिश मोरे यांनी दिली.

भविष्यात ई-नाम अंतर्गत १०० टक्के ई-गेट एन्ट्री, ई-ऑक्शन, ई-पेमेंट, भाजीपाला विभागात सौरऊर्जा प्रकल्प करण्याचा मानस व्यक्त करीत सभापती हरिश मोरे यांनी कोंडेश्वरनजीक १२८ एकरांतील जमिनीवर टर्मिनल मार्केटचा प्रस्ताव मांडला.

या टर्मिनल मार्केटमध्ये एकाच ठिकाणी धान्य, फळे, भाजीपाला, गुरांचा बाजार, रेशीम बाजार, फुलबाजार, हळद बाजार, शीतगृहे, गोदाम याचे नियमन करण्यात येणार आहे. याशिवाय सभेमध्ये प्रतिनिधींकडून मुद्दे मांडण्यात आले. यामध्ये बाजारशुल्क कमी केल्याने बाजार समितीचे १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Amaravati APMC
Amaravati APMC : अमरावती बाजार समितीत १३ कोटी रुपयांची उलाढाल

त्यामुळे बाजार समितीमधील सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याकरिता शुल्क वाढविणे, बाजार समितीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणे, अडते व खरेदीदार यांना एकच परवाना न देणे, विधवा शेतकरी महिलांना आर्थिक साह्य करणे आदी ठराव मांडण्यात आले.

सभेला उपसभापती बाळासाहेब निर्मळ, प्रताप भुयार, किशोर चांगोले, आशुतोष देशमुख, नाना नागमोते, सतीश गोटे, प्रवीण अळसपुरे, श्रीकांत बोंडे, राम खरबडे, प्रमोद इंगोले, बंडू वानखडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com