Pahalgam Terror Attack: पहलगाममधील सुरक्षा परिस्थितीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

Amit Shah Security Review: काश्मीरच्ाग जिल्ह्यातील पहलगाम शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या बैसरन कुरणात मंगळवारी (ता. २२) झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (ता. २३) हल्ल्याच्या ठिकाणी भेट देऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
Pahalgam Baisaran Valley
Pahalgam Baisaran ValleyAgrowon
Published on
Updated on

Jammu Kashmir News : काश्मीरच्ाग जिल्ह्यातील पहलगाम शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या बैसरन कुरणात मंगळवारी (ता. २२) झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (ता. २३) हल्ल्याच्या ठिकाणी भेट देऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

केंद्रीय मंत्र्यांनी हेलिकॉप्टरने त्या प्रदेशाचा हवाई आढावा घेतला आणि त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत अमित शाह यांनी परिसरात पाहणी केली. या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी परिसरातील सद्यःस्थिती आणि चालू कारवायांची माहिती दिली. या प्रदेशातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या बैसरन येथे पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दक्षता वाढवण्यात आली आहे.

Pahalgam Baisaran Valley
Amit Shah: साखर कारखान्यांना उत्पन्नवाढीचे प्रकल्प बनवण्यासाठी पाठबळ: अमित शाह

२०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वांत गंभीर हल्ल्यांपैकी एक म्हणून मंगळवारची घटना मानली जाते. बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. ज्यामध्ये किमान २६ लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले. सरकारने अद्याप मृतांची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही.

दरम्यान, पहलगामला जाण्यापूर्वी शहा यांनी श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाबाहेर एका शोक समारंभात हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली आणि पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अमित शाह यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्याचा केंद्राचा दृढ संकल्प व्यक्त केला आणि भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले.

Pahalgam Baisaran Valley
Kashmir Heavy Snowfall : हिमवृष्टीने काश्‍मीर खोरे गारठले

राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथकही बैसरन येथे पोहोचले असून तपासात जम्मू-काश्‍मीर पोलिसांना मदत करत आहे. सुमारे वीस वर्षांमध्ये या प्रदेशातील नागरिकांवरील हा सर्वांत घातक हल्ला मानला जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी, रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याने, एनआयए जम्मू-काश्मीर पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची मदत करणार आहे.

पर्यटनावरील परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न

केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी बुधवारी (ता. २३) केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाच्या (CABA) बैठकीच्या वेळी पत्रकारांना सांगितले, की काही वाईट हेतू असलेल्या लोकांनी खोऱ्यात पुन्हा एकदा फुटिरतावाद आणि दहशतवाद भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पहलगाम हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावरील परिणाम कमी करण्यासाठी पर्यटन मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करेल.

आपण स्वतः आणि आपले कार्यालय केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि पर्यटन सचिव यांच्याशी सतत संपर्कात आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या घटनेमुळे काश्मीरमधील पर्यटनावर आणि देशभरातील पर्यटनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com