Kashmir Heavy Snowfall : हिमवृष्टीने काश्‍मीर खोरे गारठले

Winter Weather : काश्‍मीरमध्ये शुक्रवारपासून (ता.२७) मध्यम ते अधिक प्रमाणात हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात श्रीनगर शहरासह खोऱ्यातील मैदानी भागांचा समावेश आहे.
Heavy Snowfall
Heavy SnowfallAgrowon
Published on
Updated on

Shrinagar News : काश्‍मीरमध्ये शुक्रवारपासून (ता.२७) मध्यम ते अधिक प्रमाणात हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात श्रीनगर शहरासह खोऱ्यातील मैदानी भागांचा समावेश आहे. दक्षिण काश्‍मीरमध्ये मैदानी भागात प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी तर मध्य काश्‍मीरमध्ये मध्यम स्वरूपाची हिमवर्षाव झाला आहे.

उत्तर काश्‍मीरमध्ये मैदानी भागात किरकोळ ते मध्यम हिमवृष्टीची नोंद झाली. जम्मू- काश्‍मीरच्या गुलमर्ग आणि तनमर्ग येथे अडकून पडलेल्या ६८ पर्यटकांना काल रात्री लष्कराने मोहीम राबवत सुरक्षितपणे बाहेर काढले.

Heavy Snowfall
Maharashtra Unseasonal Rain : आजही गारपीट, वादळी पावसाचा इशारा; राज्यातील पिकांना मोठा तडाखा!

हिमवृष्टीमुळे काश्‍मीर खोऱ्यात शनिवारी (ता. २८) जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे वाहतूक, विमान सेवा खंडित होण्याबरोबरच श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील बंद राहिला आहे. तसेच हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना अडकून पडण्याची वेळ आली. मात्र लष्कराने कारवाई करत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.

Heavy Snowfall
Maharashtra Weather Warning : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे

हिमवृष्टीमुळे रस्तेमार्ग बंद पडला होता. त्यामुळे तीस महिला, आठ मुलांसह ६८ जण काश्‍मीर खोऱ्यात अडकून पडले होते. लष्कराने बचावकार्य राबवत ६८ जणांना सुरक्षित ठिकाणी नेले. हिमवृष्टीमुळे श्रीनगर-लेह आणि मुघल रोड बंद पडला होता. श्रीनगर-जम्मू महामार्गावर सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक वाहने अडकून पडली होती.

शिवाय आज सकाळी श्रीनगर विमानतळावरून ८० टक्के उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, उत्तर भारतात पाऊस आणि दाट धुक्याचे सावट राहिले. दाट धुक्यामुळे दिल्लीत चौदापेक्षा अधिक रेल्वेगाड्यांना विलंब झाला. दिल्लीत गेल्या चोवीस तासांत सुमारे नऊ मिलिमीटरचा पाऊस पडला. गेल्या पंधरा वर्षांत डिसेंबर महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस होय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com