Water Scarcity : शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा झगडा

Water Shortage : नद्या अनेक गावांमध्ये कोरड्या पडत असल्याने येणाऱ्या कालावधीत शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही मोठा झगडा करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Kolhapur News : बागायती असणाऱ्या जिल्ह्यात मार्चपासूनच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. नद्या अनेक गावांमध्ये कोरड्या पडत असल्याने येणाऱ्या कालावधीत शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही मोठा झगडा करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. सध्‍या तरी धरणांमध्‍ये पुरेसा साठा आहे. धरणांतील पाणी तातडीने सोडून नद्या प्रवाहित कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्‍यांतून होत आहे. विशेष करुन जिल्‍ह्याच्या पूर्व भागात बिकट परिस्‍थिती आहे.

गेल्या अनेक वर्षांत महापुराची भयावह स्थिती अनुभवलेल्या शिरोळ तालुक्याला संभाव्य पाणीटंचाईची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे. नदीपात्रात पाणी नाही अशी स्थिती मार्च महिन्यात पाहायला मिळत आहे. आगामी दोन महिन्यांच्या काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

Water Shortage
Water Scarcity : साडेतीनशेवर गाववाड्यांत पाणी टंचाई

बागायती असणाऱ्या नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे, शिरढोण, धरणगुत्ती यासह परिसरात मोठ्या कोबी, फ्लॉवर, टोमॅटो यासह भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. मात्र पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. अशी गंभीर परिस्थिती असतानाही पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला नाही.

Water Shortage
Water Scarcity : पाणीटंचाईचा उन्हाळी पिकांच्या लागवडीवर फटका

अशीच परिस्‍थिती कृष्णा नदीकाठावरही आहे. वाढत्या उन्हामुळे पिकांना जादा पाण्याची गरज लागत असून पाण्याचा फेरा वेळेत होत नसल्याने पिकांची अवस्‍था बिकट होत असल्याचे चित्र आहे. उसाच्या नव्‍या लागवडीही पाण्यामुळे धोक्यात येत असून येथून जिल्ह्याच्या ऊस पट्यातही अस्वस्थता आहे.

धरणांत ५० टक्के साठा शिल्लक

जिल्ह्यातील धरणांत सरासरी ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्‍याची मागणी मोठी असल्याने हे पाणीही काटकसरीनेच वापरावे लागणार आहे. सध्या राधानगरी, तुळशी वारणा वगळता अन्य कोणत्याही प्रकल्पांतून नदीत पाणी पात्रात सोडले जात नसल्याची स्थिती आहे. मोठ्या धरणांतूनही अत्‍यल्प पाणी सोडण्यात येत असल्याने नद्या काही ठिकाणी कोरड्या होत आहेत. काही छोट्या नद्यांना तर पाणी नसल्याने डबक्‍याचे स्वरूप येत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com