Ashish Mishra
Ashish Mishra Agrowon

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन फेटाळला

० फेब्रुवारी रोजी लखनौ खंडपीठाने आशिषला जामीन मंजूर केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला आणि पीडितांना पुरेशी संधी देऊन त्याच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले.
Published on

लखनौ (वृत्तसंस्था) ः अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मंगळवारी (ता. २६) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ (Ashish Mishra Case) यांचा मुलगा आणि लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनू याचा जामीन अर्ज फेटाळला. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Ashish Mishra
Poultry : ग्रामीण उद्योजकतेला ‘मिनी इनक्युबेटर’ मुळे मिळाला वाव

न्यायमूर्ती कृष्णा पहल यांच्या खंडपीठाने सांगितले, की आशिष मिश्रा राजकीयदृष्ट्या इतका प्रभावशाली आहे, की तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो आणि खटल्याला प्रभावित करू शकतो. खंडपीठाने १५ जुलै रोजी सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. १० फेब्रुवारी रोजी लखनौ खंडपीठाने आशिषला जामीन मंजूर केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला आणि पीडितांना पुरेशी संधी देऊन त्याच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले.

त्यानुसार उच्च न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी केली. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे झालेल्या चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी मिश्रा हा सहआरोपी आहे. भरधाव येणाऱ्या वाहनाने शेतकरी व पत्रकार यांना चिरडले. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एका वाहनाच्या चालकाचा संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. हिंसाचाराच्या संदर्भात दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com