
Maharashtra Stamp Paper : राज्य सरकारने १००, २०० रूपयांचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचा आदेश लागू केला आहे. राज्याच्या तिजोरीत जादा महसूल येण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.१६) होणार आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी (ता.१४) काढला.
प्रतिज्ञापत्र, घरासाठीचा भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारे संचकार पत्र, शैक्षणिक कामासाठी लागणारे हमीपत्र, विक्री करार अशा अनेक कामांसाठी १०० आणि २०० रूपयांपर्यंत मुदांकाचा वापर व्हायचा. परंतु सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे सर्वच स्तरातील नागरिकांना ५०० रुपयांचा मुद्रांक वापरवा लागणार आहे. तसेच अतिरिक्त ४०० रुपये मोजावे लागणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्ते केली आहे.
हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता, त्यासाठीही आता ५०० रुपयांचा मुद्रांक मोजावा लागणार आहे. पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागेल. मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.
विविध लोकानुययी योजनांचा कोट्यवधींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी इतर योजनांसाठी निधींची कमतरता पडल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी असे निर्णय घेतल्याचे माहिती समोर आली आहे.
सर्वसामान्यांना कोणतेही प्रतिज्ञापत्र करण्यासाठी १०० रुपयांचा मुद्रांकच परवडणारा आहे. त्यासाठी त्याला ५०० रुपये मोजावे लागू नयेत. त्यामुळे ही ५ पट वाढ कमी करावी अशी मागणी कोल्हापुरातील मुद्रांक विक्रेते बुधवारी (ता.१६) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आवाहन करणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.