Malegaon Blast : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

NIA Court Verdict : मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या १७ वर्षांपासून याप्रकरणी खटला सुरू होता.
Malegaon Blast Case
Malegaon Blast CaseAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष ‘एनआयए’ (राष्ट्रीय तपास संस्था) न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणातील सातही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांचाही यात समावेश आहे.

मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या १७ वर्षांपासून याप्रकरणी खटला सुरू होता. तो देशभरात चर्चेचा विषय ठरला. या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (ता.३१) विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर पार पडली.

घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, ३० सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Malegaon Blast Case
Malegaon Blast: मालेगांव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांची नावे यात होती. १७ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

Malegaon Blast Case
Malegaon APMC Dispute : बाजार समितीतील वादात शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी

सुरुवातीला दहशतवादी विरोधी पथकाकडे तपास होता, नंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे वर्ग करण्यात आला. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

न्यायाधीश लाहोटी यांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर प्रश्न उपस्थित केले. ‘‘बॉम्बस्फोट झाला त्याठिकाणचा पंचनामा योग्य नाही. तसेच आरडीएक्स बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. फक्त संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही. जागेवरून हाताचे ठसे जप्त करण्यात आले नाही,’’ असे निरीक्षणही या वेळी न्यायाधीशांनी नोंदवले. याशिवाय दुचाकीचा चेसी नंबरदेखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

आरोप काय होते?

आरोपींविरोधात यूएपीए कलम १६ (दहशतवादी कृत्य करणे) आणि १८ (दहशतवादी कृत्याचा कट रचणे) १२० (ब) (गुन्हेगारी कट), ३०२ (खून), ३०७ (खून करण्याचा प्रयत्न), ३२४ (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि १५३ (अ) (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आदी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत खटला चालवण्यात आला.

३० साक्षीदारांचा मृत्यू, ३४ फितूर

या खटल्यात ‘एनआयए’तर्फे ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले, तर आरोपपत्रात उल्लेख असलेल्या जवळपास ३० हून अधिक साक्षीदारांची साक्ष देण्यापूर्वीच मृत्यू झाला. याशिवाय, त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले. हे साक्षीदार पुरोहित आणि कथित कट रचण्याच्या बैठकांशी संबंधित होते.

तथापि, बॉम्बस्फोटांचा कट रचण्याबद्दल आरोपींनी केलेल्या कोणत्याही चर्चेत आपण सहभागी झाल्याचे किंवा ही चर्चा ऐकल्याचे या साक्षीदारांनी नाकारले. प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करणाऱ्या ‘एटीएस’ने जबरदस्तीने, बेकायदेशीरपणे आपल्याला ताब्यात घेतले. तसेच काही व्यक्तींची नावे सांगण्यास, खोटे विधान करण्यास धमकावल्याचा आरोपही या साक्षीदारांनी साक्ष नोंदवताना केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com