Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

Farmer Remuneration : खानदेशात अक्षय तृतीयेला सालगडी नियुक्ती, त्यांचा मोबदला निश्‍चित करण्याचा प्रघात, परंपरा आहे. यानुसार यंदा सालगड्यांचा नवा मोबदला किती असेल याची उत्सुकता असून, सातपुडा पर्वतातील मजूर बांधवांची नियुक्ती करण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसत आहे.
Remuneration of Salgadi
Remuneration of SalgadiAgrowon

Jalgaon News : खानदेशात अक्षय तृतीयेला सालगडी नियुक्ती, त्यांचा मोबदला निश्‍चित करण्याचा प्रघात, परंपरा आहे. यानुसार यंदा सालगड्यांचा नवा मोबदला किती असेल याची उत्सुकता असून, सातपुडा पर्वतातील मजूर बांधवांची नियुक्ती करण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसत आहे.

अक्षय तृतीया शेती, शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शेतीचे नवे काम, लागवडी याच मुहूर्ताला सुरू केल्या जातात. अनेक शेतकरी आपल्या शेतीसाठी नवी यंत्रणाही अक्षय तृतीयेस खरेदी करतात. सध्या खानदेशात मजूरटंचाई आहे. परंतु अशातही आपल्या शेतीचा गाडा पुढे नेण्यासाठी कुशल सालगड्यांची शोधाशोध करावी लागते.

Remuneration of Salgadi
Remuneration Issue : ग्रामपंचायत संगणक परिचालक मानधनाविना

या स्पर्धेत सातपुडा पर्वत भागातील मंडळीला सालगडी म्हणून नियुक्त करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. शेतमजुरी व अन्य कामांसाठी सातपुड्यातून अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह खानदेशात दाखल झाले आहेत. ही मंडळी आता चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगरातील कन्नडपर्यंत पोहोचली आहे.

गावोगावी स्थानिक मंडळी सालगड्याचे काम करण्यास नकार देऊ लागली आहे. कारण या कामात एकाच मालकाडे वर्षभर कामात गुंतवून घ्यावे लागते. यामुळे स्थानिक भागातील मंडळी सालगडी म्हणून फारशी काम करताना दिसत नाही.

Remuneration of Salgadi
Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

सालगडी म्हणून काम करताना पूर्वी पशुधानाचा सांभाळ, त्यांचा चारा-पाणी, बंधारे, माती कामे, औत हाकणे आदी कामे करावी लागत होती. परंतु अलीकडे पशुधनाची संख्या कमी झाली आहे. तसेच बैलजोड्याही कमी असून, ट्रॅक्टरने मशागत अधिकची केली जाते. आता सिंचन यंत्रणांचे बारकावे, ट्रॅक्टर चालविणे, फवारणी कामात पारंगत सालगड्यांना प्राधान्य आहे. मोठे शेतकरीच अधिकचे सालगडी नियुक्त करतात. पूर्वी पशुधनासाठी सालगड्यांची संख्या अधिक राखावी लागत होती. परंतु ही संख्या कमी आहे. कुशल सालगड्यांसाठी शेतीमालक शोधाशोध करीत आहेत.

नंदुरबारातील प्रथेलाही महत्त्व

नंदुरबारात सालगडी नियुक्त करताना इच्छुक व्यक्तीची चाचणी किंवा परीक्षा घेतली जाते. त्यात नंदुरबार शहरात एक भलामोठा दगड आहे. हा दगड उचलणाऱ्यास शेतकरी सालगडी म्हणून नियुक्त करतात. अलीकडे या प्रथेचे महत्त्व कमी झाले आहे. परंतु प्रघात, परंपरा म्हणून शेतकरी आपल्याकडे नियुक्त केलेल्या शेतकऱ्याला हा दगड उचलण्याची औपचारिकता पूर्ण करून घेतात.

७० ते ८० हजार रुपये मोबदला

आतापर्यंत सालगड्यांना ७० ते ८० हजार रुपये मोबदला दिला जात होता. मागील वर्षीदेखील हाच मोबदला होता. यंदा हा मोबदला किती टक्के वाढतो किंवा कायम ठेवला जातो की काय, याची उत्सुकता आहे. कारण शेतकरी मंडळीला केळी, कापूस पिकात नुकसान आले आहे. अनेक भागात नैसर्गिक समस्याही होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com