Ajit Pawar : पंतप्रधान मोदींकडे राज्यातील योजनांसाठी मागितला केंद्राचा निधी ः अजित पवार

Maharashtra Government Scheme : अहिल्यानगर जिल्ह्यातून पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी या भागातील धरणात वळविण्याची योजना राबविणार आहोत. त्यासाठी ८५ हजार कोटींच्या निधीची गरज आहे.
Ajit Pawar On NCP Manifesto
Ajit Pawar On NCP ManifestoAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातून पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी या भागातील धरणात वळविण्याची योजना राबविणार आहोत. त्यासाठी ८५ हजार कोटींच्या निधीची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दोन दिवसांपूर्वीच बोललो आहे. राज्यातील अन्य योजनांसाठीही केंद्राकडे निधी मागितला आहे. निळवंडे धरणाचा पाच दशकाचा रखडलेला प्रश्‍न आम्ही मार्गी लावला असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोपरगाव येथे गुरुवारी (ता. १४) सायंकाळी उशिरा आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. माजी आमदार अशोक काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, की अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच दशकांपासून प्रलंबित निळवंडे धरणाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. त्यामुळे अकोले, संगमनेर, राहाता राहरी, कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील

Ajit Pawar On NCP Manifesto
Ajit Pawar On NCP Manifesto : राष्ट्रवादीचा जाहीरनामा; एमएसपी, लॉजिस्टीक पार्कसह लाडकी बहीण योजनेवर अजित पवार यांचे आश्वास

शेताला फायदा होणार आहे. निळवंडेचा पाच दशकांचा रखडलेला प्रश्‍न सोडविला. आधी पुढारी केवळ यायचे, नारळ फोडायचे. आता आम्ही त्यावर काम करतोय. कालव्याचे, चाऱ्या व राहिलेले काम करायचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातीतून पश्‍चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणात वळवायचे आहे. ८५ हजार कोटी रुपयांची योजना आहे.

त्यासह राज्यातील अनेक योजनांसाठी नरेंद्र मोदी यांना दोन दिवसांपूर्वीच याबाबत बोललो आहे. केंद्राकडे निधी मागितला आहे. जागतिक बँक, वल्ड बॅंकेचा निधी उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली आहे. सामान्य लोकांचे प्रश्‍न सोडणविण्याला प्राधान्य दिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत अनेकांना आमदार केले आहे.

Ajit Pawar On NCP Manifesto
Ajit Pawar Manifesto : सन्मान निधीत वाढ, कर्जमाफीचा वादा

जातीय सलोखा राहिला पाहिजे. महिला, तरुण, तरुणी, शेतकरी आमच्या पाठीशी आहेत. सबका साथ सबका विकास करायचा आहे. फेक नेरेटिव्ह सेट केल्याने नुकसान होत आहे. भाषणे करताना महाराष्ट्रासाठी काय करणार ते सांगितले पाहिजे. व्हिजन काय ते सांगा. मात्र तसे करत नाहीत. संविधानाबाबत खोटं सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने कारखान्याला मदत करून साडेनऊ हजार कोटी रुपये माफ केले. साखर कारखान्यावरील कायमचे दुखणे दूर केलं. कांदा उत्पादकांना मदत केली. कांदा निर्यातबंदी उठवली. समृद्धी महामार्गाचा लोकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा विरोध घेऊ शकत नाही. लाडकी बहीण योजना केली ते काही चुकीचं केलं नाही. पाच वर्षे योजना चालू ठेवायची आहे. सगळ्यांना न्याय द्यायचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com