
Nanded News : जिल्ह्यातील लेंडी, मानार आणि कोलंबी (ता. नायगाव) उपसा सिंचन प्रकल्पांसह नरसी-बोधन-मुखेड आणि नांदेड-हैदराबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर देण्याची ग्वाही दिली. गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी सोडवण्यासाठीही लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
नरसी (ता. नायगाव) येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (ता.२३) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,
माजी मंत्री नवाब मलिक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजू नवघरे, आमदार संजय बनसोडे, आमदार राजेश विटेकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. मिनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार विक्रम काळे, माजी आमदार मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, व्यंकटराव गोजेगावकर उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत विशेष बैठक घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात रवी खतगावकर, बाळासाहेब खतगावकर, सुरजितसिंग गिल, भास्कर भिलवंडे, श्रीराम राजूरकर, भीमराव जेठे, गणेशराव करखेलीकर आणि बिराजदार यांच्यासह ३०० हून अधिक सरपंच, चेअरमन आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी प्रवेश केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.