Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीची अक्षरश: धुळधाण केली आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरून मताचे दान टाकले आहे. महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीला अवघ्या ४६ जागा मिळाल्या आहेत.
त्यामुळे राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. सत्तास्थापनेपूर्वीच अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्वात कमजोर घटक पक्ष म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जात होते. परंतु, राष्ट्रवादीने या निवडणुकीत अनपेक्षित कामगिरी करत ४१ जागांवर विजयश्री खेचून आणली आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही काँग्रेसमध्येही घडामोडींना वेग आला आहे.
गटनेतेपदी अजित पवार 'पुन्हा'
निवडणूक निकालात महायुतीने बाजी मारल्यानंतर आज सकाळपासूनच अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राज्यभरातून नवनिर्वाचित आमदारांसह कार्यकर्त्यांनी पवारांच्या भेटीसाठी एकच गर्दी केली आहे. यावेळी नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे या पदावर सर्वानुमते अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला असला तरी कार्यकर्त्ये आणि नेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनीही मुंबई गाठली असून आज संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकीकडे निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. तर, अनपेक्षित अशा यशामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायाला मिळत आहे. आता सर्वांच्या नजरा भाजपकडे लागल्या असून भाजप मुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांच लक्ष आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.