AI In Farming : ‘एआय’ तंत्र घडवेल कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल

Prataprao Pawar : बारामतीमधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये यशस्वी झालेला ‘एआय’ प्रकल्प आता एका प्रांताचा नव्हे; तर साऱ्या देशाचा होणार आहे, असा आत्मविश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.
Prataprao Pawar
Prataprao Pawar Agrowon
Published on
Updated on

Pune News : शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास शेतकऱ्याला किमान एक लाख रुपयांपर्यंत हमखास उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. बारामतीमधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये यशस्वी झालेला ‘एआय’ प्रकल्प आता एका प्रांताचा नव्हे; तर साऱ्या देशाचा होणार आहे, असा आत्मविश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.

‘अॅग्रोवन’च्या शाश्‍वत शेती परिषदेत श्री. पवार यांनी देशाच्या कृषी व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राची माहिती दिली. ते म्हणाले, “सकाळ रिलीफ फंडातून एक हजार गावांमध्ये पाणी आले.

आमचे वडील बंधू अप्पासाहेब पवार यांनी ड्रीप तंत्रासाठी सारे आयुष्य झोकून दिले. ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून कृषी क्षेत्रात समृद्धी येत आहे. तुम्ही सारे या उपक्रमाचे भागीदार आहात. आम्ही केवळ वर्तमानपत्र चालवत नाही. समाजाच्या हितासाठी आवश्यक ठरणारे विविध उपक्रम राबवून समाधान मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो.’’

Prataprao Pawar
AI in Agriculture: ‘एआय’चा बोलबाला

‘एआय’ प्रकल्प साऱ्या देशाचा होणार

शेतीमध्ये कृत्रिम बद्धिमत्तेच्या वापरामागील कथा उलगडताना श्री. पवार म्हणाले, ‘‘एआयची माहिती माझ्या वाचनात आल्यानंतर हे तंत्र भारतात आणण्यासाठी मी ऑक्सफर्ड विद्यापीठात संपर्क केला. ते शेतीमध्ये एआय राबविण्याबाबत उत्साही होते. बारामती येथील सर्व सुविधा पाहिल्यानंतर पुढे मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्‍स फाउंडेशन या जागतिक संस्था बारामतीत एकत्र आल्या. आमचा करार झाला. त्यातून ऊस शेतीसाठी उभा राहिलेला ‘एआय’ प्रकल्प यशस्वी ठरला. त्यातून मिळणारे फायदे लक्षात घेता हे तंत्र आता देशभर पसरणार आहे.

Prataprao Pawar
Ai in Agriculture: ‘एआय’चा वापर फळबागेत करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकऱ्याला कोणत्याही पिकात किमान एक लाखाचा नफा मिळावा, ही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची इच्छा आहे. ही क्षमता एआयमध्ये असून, पिकाची उत्पादन व गुणवत्ता वाढवतानाच निविष्ठा, पाणी आणि खर्चात ६० टक्क्यांइतकी बचत साधली जाते. यामुळे नक्कीच शेतकरी आत्महत्या थांबतील.

‘एआय’ तंत्राच्या प्रसाराची पुढील दिशा स्पष्ट करताना श्री. पवार म्हणाले, ‘‘उसातील यशस्वी ठरलेले हे तंत्र आता कापूस, सोयाबीन शेतीत नेण्यासाठी संशोधन सुरू आहे. या तंत्रात बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने स्वतः गुंतवणूक केली. कारण शेती समृद्ध व्हावी व त्यातून शेतकऱ्यांचे हित साधले जावे, हा हेतू त्यामागे आहे.

आता हे तंत्र पुढे नेण्याची जबाबदारी एकट्या ट्रस्टची किंवा सरकारची नाही, तर ती तुमची आमची सामुदायिक जबाबदारी असेल. या तंत्राचा प्रसार देशभर होण्यासाठी मला पंतप्रधान कार्यालयाने निमंत्रित केले आहे. एआय तंत्राच्या रुपाने विकासाची गंगा आम्ही तुमच्या दाराशी आणली आहे. त्याचा सर्वांसाठी वापर झाल्यास माझ्यासाठी त्यापेक्षा समाधानाची दुसरी बाब नसेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com