AI in Farming: ‘एआय’चा वापर सर्व पिकांसाठी शक्य

Agriculture Development: ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर केवळ महाराष्ट्रातील ऊस शेतीपुरताच मर्यादित नसून देशातील सर्व प्रकारच्या पिकांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान सर्व भाषांमध्ये उपलब्ध असेल.
Prataprao Pawar
Prataprao PawarAgrowon
Published on
Updated on

New Delhi News: ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर केवळ महाराष्ट्रातील ऊस शेतीपुरताच मर्यादित नसून देशातील सर्व प्रकारच्या पिकांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान सर्व भाषांमध्ये उपलब्ध असेल. या संशोधनाचा लाभ होऊन भारतातील कुठल्याही शेतकऱ्याला किमान एक लाख रुपये प्रति एकर उत्पन्न मिळावे असा उद्देश आहे.

या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार ते अडीच लाखांदरम्यान वाढू शकते,’’ असे प्रतिपादन बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानचे विश्‍वस्त आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

Prataprao Pawar
AI in Education: ‘रयत’मध्ये पाचवीपासून पदवीपर्यंत‘एआय’चे शिक्षण : शरद पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सेमिनार सभागृहात पार पडलेल्या सहकारी साखर उद्योग संमेलनात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमधील वापर’ या विषयावर बुधवारी (ता.२) आयोजित केलेल्या चर्चासत्रात मुख्य वक्ते म्हणून श्री. पवार बोलत होते.

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. प्रशांत कुमार दास होते. या वेळी कोइमतूर येथील शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. पी. गोविंदाराज, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मुख्य ऊस सल्लागार डॉ. डी. बी. डौले उपस्थित होते.

Prataprao Pawar
AI In Agriculture : ‘एआय’च्या रूपाने शेतकऱ्यांच्या दारात गंगा

श्री. पवार म्हणाले, ‘‘एआय तंत्राच्या वापराने उसाचे उत्पादन ६० ते शंभर टक्के वाढू शकते, हे एक हजार शेतकऱ्यांच्या सहभागातून केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. या तंत्रामुळे उसाचा उतारा २ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तसेच खते, पाणी, वीज, कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे.

‘एआय''मुळे महाराष्ट्रातील पीक पद्धती बदलण्यास मदत होणार असून, त्यासाठी एक वर्ष पुरेसे ठरेल. गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या आमच्या ट्रस्टने १४ ते १५ पेटंट मिळवले आहेत. मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स फाउंडेशन आणि ऑक्स्फर्ड विद्यापीठाने आमची क्षमता अनुभवली आहे.’’

एआय तंत्रज्ञान मोठ्या लोकांसाठी नव्हे तर एक एकर शेती असलेल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले आहे. या तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रात उसाचे एकरी उत्पादन निम्म्या खर्चात ८५ ते दीडशे टनापेक्षा जास्त होऊ शकते, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी श्री. पवार यांचे स्वागत केले. या वेळी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने डॉ. योगेश फटाके आणि डॉ. विवेक भोईटे यांनी सादरीकरण केले तसेच उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com