Robot For Agriculture
Robot For AgricultureAgrowon

Robot In Agriculture : भारतीय शेतीला एआय आणि रोबोट सावरतील...

अमेरिकेतच एक फार्मशॉर्ट या स्टार्टअपने सॅटेलाईट आणि ड्रोनचा वापर शेतीत सुरू केला आहे. या कंपनीचे सॉफ्टवेअर वापरल्यामुळे खताच्या वापरात 40 टक्क्यांची बचत होते.

नानासाहेब पाटील

भारतीय शेतीत ड्रोन्सचा (Agricultural Drone) बोलबाला वाढत आहे. भविष्यात ड्रोन्स म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचे (Farmer) उडते यांत्रिक पाखरंच असतील. 

जपानमध्ये (Japan) तर 1980 पासून ड्रोनचा शेतीमध्ये कसा वापर करता येईल, यावर संशोधन सुरू आहे. 2027 पर्यंत ड्रोनची शेतीमधील विक्री 480 दशलक्ष डॉलर्सच्या पुढे गेलेली असेल. 

स्काय स्किरल नावाची एक कंपनी सध्या द्राक्षबागांसाठी ड्रोनचा (Grape Crop) वापर करते आहे. यामुळे द्राक्षाचे उत्पादन (Grape Producer) वाढतेच पण बागेच्या खर्चात देखील बचत होते.

हा ड्रोन द्राक्षबागेवर फिरतो आणि बागेची पाहणी करून आरोग्याची स्थिती कशी आहे याची माहिती देतो. अवघ्या 24 मिनिटात 50 बागेची पाहणी करून आरोग्यपत्रिका तयार करण्याचे कसब या ड्रोनकडे आहे.

याशिवाय हवामानावर आधारित माहितीबाबत देखील काही आर्टिफिशियल इंटिलेजन्स (Artificial Intelligence) तयार होत आहेत. सॅटेलाईटचा डाटा वापरून हवामानाचा अंदाज (Weather Department) घेण्याबरोबच शेतातील कीड-रोगांचा अंदाज बांधण्याचे काम एव्हेअर कंपनी करते आहे. 

अमेरिकेतच एक फार्मशॉर्ट या स्टार्टअपने सॅटेलाईट आणि ड्रोनचा वापर शेतीत सुरू केला आहे. या कंपनीचे सॉफ्टवेअर वापरल्यामुळे खताच्या वापरात 40 टक्क्यांची बचत होते.

भविष्यात सॅटेलाईटच्या माहितीचा आधार घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भरपूर वाढतील असा माझा अंदाज आहे.

Robot For Agriculture
Agricultural Drone : भाडेतत्त्वावर आधारित ड्रोन केंद्र स्थापन करणार : कुलगुरू डॉ. मणी

भारतीय शेतीला आता एआय आणि रोबोट सावरतील, असे मला वाटते. कारण, ते प्रामाणिक आणि भरवशाचे आहेत. तुम्हाला माहिती असेलच की महिंद्रा कंपनीने भारतात पहिला ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर आणला आहे. ही रोबोट युगाची खरी सुरूवातच आहे.

मायक्रोसॉफ्टसारखी बलाढ्य कंपनी इक्रिसॅटबरोबर भारतीय शेतीत काम करते आहे. हे स्वागतार्ह आहे. कारण या दोघांच्या प्रयत्नांतून आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा  वापर करून दक्षिण भारतात काही भागात शेतकऱ्यांना सेवा दिली जाते.

पेरणीपासून काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर कृषी सल्ला तसेच सिंचनविषयक मार्गदर्शन मोबाईलच्या माध्यमातून केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात ३० टक्के वाढ झाल्याचा दावा केला जात आहे.

बंगरूळच्या क्रॉप्सइन कंपनीने बटाटा उत्पादक शेतक-यांच्या  प्लॉटसला एकत्र आणून प्रत्येक प्लॉटसाठी सल्ला, शेडयुल, ट्रेसिबिलिटी, कीड-रोग सल्ला अशा सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

याच भागात मिलान शर्मा नावाच्या आयआयटीयनने इन्टेलोलॅब्ज ही कंपनी दोन वर्षांपूर्वी सुरू केली आहे. ही कंपनी फळे,भाजीपाला,धान्याचे स्वयंचलित ग्रेडिंग करून देते. कीडरोगाचा सल्ला देखील आर्टिफिशियल इंटिलिजन्टसच्या माध्यमातून देते.

Robot For Agriculture
Agricultural Drone : ‘लोकमंगल’मध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोन जनजागृती कार्यक्रम

उत्तर प्रदेशात गोबॅस्को नावाची कंपनी हजारो शेतकऱ्यांबरोबर काम करते आहे. मध्यप्रदेशात ग्रामोफोन कंपनी आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या माध्यमातून चक्क एक लाख शेतकऱ्यांबरोबर काम करते आहे.

याच तंत्राचा वापर करून जीवाभूमी फुडप्रिंट कंपनी बाजारपेठा व शेतकरी यांना जोडून देण्याचे काम करते. तसेच ती शेतकऱ्यांना  पेरणी, कीड-रोग नियंत्रण आणि काढणीचा सल्ला शेतकऱ्यांना देते आहे.

माझ्या मते भारतात आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या वापराला अतिशय आशादायक सुरूवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी समृध्द होतील. 

भारतीय शेतीमधील अनेक समस्या मानवनिर्मित आहेत. अशावेळी शेतकऱ्याच्या मदतीला बेभरवशाची माणसं नव्हे तर प्रामाणिक रोबोट येतील. ते दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com