Dr. Sudhir Kumar Goel : ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांचा गुगल व्हावे

Agrowon Newspaper : पिकाचा इतिहास, बाजारातील कल, शास्त्रीय माहिती जाणून घ्यायची असल्यास ॲग्रोवन वगळता सध्या तरी कोणते माध्यम उपलब्ध नाही.
Dr. Sudhir Kumar Goel
Dr. Sudhir Kumar GoelAgrowon
Published on
Updated on

आपल्या मनात कोणत्याही विषयाबाबत काही शंका, उत्सुकता, प्रश्‍न असल्यास किंवा अतिरिक्त माहिती हवी असल्यास इंटरनेटवर ‘गुगल’ मदत करतो. माझ्या मते महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रापुरते ‘ॲग्रोवन’ हे वर्तमानपत्र शेतकऱ्यांचा गुगल होण्याचा मार्गावर आहे.

कारण २००५ पासून या वर्तमानपत्राकडे अफाट माहिती जमा झाली आहे. शेतीसंबंधी कोणत्याही विषयावर किंवा पिकाबाबत इत्थंभूत माहिती पुरविण्याची क्षमता केवळ याच वर्तमानपत्राकडे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या उद्योजकाला टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे. त्याला या पिकाचा इतिहास, बाजारातील कल, शास्त्रीय माहिती जाणून घ्यायची असल्यास ॲग्रोवन वगळता सध्या तरी कोणते माध्यम उपलब्ध नाही.

Dr. Sudhir Kumar Goel
Rabi Sowing : खानदेशातील रब्बी पेरणी ३० टक्के पूर्ण

त्यामुळे कृषी क्षेत्रातील विविध विषयांवरील संकलित माहिती डिजिटल आणि छापील स्वरूपात उपलब्ध करून देणारा एखादा उपक्रम या दैनिकाने सुरू केल्यास त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. कृषी व संलग्न क्षेत्रातील अक्षरशः शेकडो यशोगाथा या दैनिकाने प्रसिद्ध केल्या. त्या संपादित करून पुस्तक रूपाने प्रसिद्ध करायला हव्यात. मुळात, या दैनिकामुळे कृषी विस्ताराचं मोठं काम घडून आलं आहे. असंख्य शेतकरी या दैनिकामुळे ताठ मानेने उभे राहिले आहेत.

कोणतेही प्रयोग, शास्त्रीय माहिती किंवा यशोगाथा प्रसिद्ध करताना संबंधित व्यक्तींचे संपर्क क्रमांक देण्याची या दैनिकाची पद्धत मला खूप भावली. त्यामुळे शेतकरी एकमेकांच्या संपर्कात आले. मी स्वतः कृषी खात्याचा प्रशासकीय प्रमुख असताना विविध लेखांखालील संपर्क क्रमांक आवर्जून नमूद करून ठेवायचो. संबंधित प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क करणे, त्यांचे अभिनंदन करून प्रोत्साहन देणे ही माझी सवय आजही कायम आहे.

काही वर्षांपूर्वी राज्याच्या कृषी क्षेत्रात निराशेचे वातावरण होते. ते दूर करण्यासाठी सरकार, समाज तसेच माध्यमांमधून विविध प्रयत्न झाले. त्यात या दैनिकाचा सहभाग अतिशय मोलाचा ठरला. शेतकरी अडचणींवर मात करू शकतो, तो पुन्हा उभा राहू शकतो, तो समृद्ध होऊ शकतो हा संदेश अतिशय प्रभावीपणे गावशिवारात गेला.

Dr. Sudhir Kumar Goel
Gram Panchayat Election : विदर्भातील ४६२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

शासनाच्या धोरणांवर टीकाटिप्पणी होत असते. परंतु मी पुढे जाऊ शकतो असा आत्मविश्‍वास या दैनिकाने राज्यातील युवा शेतकऱ्यांना दिला. मला शंभर टक्के खात्री आहे, की नजीकच्या कालावधीत या दैनिकाच्या पाठबळातून, उपक्रमांतून शेतकऱ्यांची नवी पिढी हिमतीने पुढे जात राहील. उदाहरणार्थ, बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा असेल तर या दैनिकाकडे वर्षानुवर्षांचा डेटा उपलब्ध आहे.

तो समग्र रूपात शेतकऱ्यांना मिळाल्यास त्यातून नियोजन आखणीला कैकपट मदत होईल. तसेच बाजारभाव काय राहू शकतात यासंदर्भातील मार्केट इन्टेलिजन्सची माहिती सध्या दिली जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना आपला माल कधी विकायचा, याचा निर्णय घेण्यासाठी मोठी मदत होते. मुद्रित माध्यमासोबतच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची संधी आता उपलब्ध झालेली आहे.

(शब्दांकन ः मनोज कापडे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com