Dr. S. A. Patil : कृषिशास्त्रज्ञ डॉ. एस. ए. पाटील यांचे हृदयविकाराने निधन

कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉ. पाटील यांनी कापूस, भुईमूग,कारळे, सूर्यफूल आणि एरंड या महत्त्वाच्या व्यावसायिक पिकांच्या १६ संकरित आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या.
Dr. S A Patil
Dr. S A PatilAgrowon
Published on
Updated on

बंगळूर - प्रख्यात कृषिशास्त्रज्ञ आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय) माजी संचालक डॉ. एस. ए. पाटील यांचे सोमवारी (ता.१५) वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. सध्या बंगळूर शहरातील भगवतीनगर हाऊस येथे त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ आहे. त्यांची तिन्ही मुले अमेरिकेत असल्याने ती आल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय डॉ. पाटील यांचे भाऊ आणि नातेवाईकांनी घेतला आहे.

कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉ. पाटील यांनी कापूस, भुईमूग,कारळे, सूर्यफूल आणि एरंड या महत्त्वाच्या व्यावसायिक पिकांच्या १६ संकरित आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या. तसेच विकसित केलेले कापसाचे वरलक्ष्मी हे जगातील पहिले लांब धाग्याचे हायब्रीड वाण आहे.

Dr. S A Patil
Agricultural Research Centre Kolhapur : पोहे, चिरमुऱ्यासाठी भाताचे नवे वाण, राधानगरी कृषी संशोधन केंद्राकडून विकसित

डॉ. पाटील धारवाड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते. इंडियन सोसायटी आॅफ अॅग्रिबिझनेस प्रोफेशनल्स (आयएसएपी) या संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. डॉ. पाटील यांनी कृषी अध्यापन, संशोधन, विस्तार, विकास आणि प्रशासनाशी संबंधित ५० संस्थांमध्ये अध्यक्ष वा सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि विद्यापीठ स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. पाटील कर्नाटक कृषी अभियानाचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून रुजू होण्यापूर्वी, डॉ. पाटील कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाड येथे कुलगुरू होते. कृषी आणि पीएच. डी- जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग या विषयात बीएससी ऑनर्स आणि एमएस्सी पदवी विषयात डॉ. पाटील यांनी प्राविण्य मिळवले होते. ते आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील २५ कृषी वैज्ञानिक नियतकालिकांचे आजीवन सदस्य आहेत.

त्यांचे कृषी क्षेत्रातील संशोधनात अनेक विद्यार्थी घडवले. तसेच २९९ विविध प्रकाशन त्यांच्या नावावर आहेत. डॉ. पाटील यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि विद्यापीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com