Agriculture Minister Visit: नुकसानग्रस्त कांदा लागवड पाहण्यासाठी कृषिमंत्री बांधावर, शेतकऱ्यांशी थेट संवाद!

Crop Loss Inspection: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रविवारी (ता.२६) सायंकाळी उशिरा देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पाहणी केली.
Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

Nashik News: कांदा पिकावर तणनाशक फवारल्याने देवळा तालुक्यातील मेशी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास १०० एकर, तर कळवण तालुक्यातील निवाने, वरवंडी परिसरांत जवळपास ५० असे १५० एकर कांदा लागवडीमध्ये १०० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रविवारी (ता.२६) सायंकाळी उशिरा देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पाहणी केली.

तणनाशक फवारणी केल्याने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे श्रम, लागवड खर्च वाया गेल्याचे चित्र आहे.त्यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने देवळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे. यात १२० एकरवर नुकसान समोर आले आहे. तसेच, त्यात वाढ होत आहे. मंत्री कोकाटे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकाच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी व्यथा मंत्र्यांसमोर मांडल्या.

Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Kokate : कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाची रात्री पाहणी; तणनाशक कंपनीवर कारवाईचे निर्देश

या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे आदी उपस्थित होते. तणनाशकाचे परीक्षण करण्याचे तसेच पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे, कृषी विज्ञान केंद्राचे विशाल चौधरी, पंचायत समितीच्या कृषी अधिकारी नलिनी खैरनार, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाहणी केली आहे.

Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Kokate : योजनेतील गैरव्यवहार वक्तव्याचा विपर्यास केला; कृषिमंत्री कोकाटे मिडियावर संतापले

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सूर्यवंशी यांनी संबंधित दोन कृषी सेवा केंद्रातून विक्री नमुने ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी ज्या ठिकाणी हा साठा शिल्लक आहे, त्यास विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. नमुने गोळा करून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आहे. तर, कळवण येथे संबंधित विक्रेत्याला विक्री बंदचा आदेश देण्यात आला होता.

लागवड केलेल्या कांद्याची तणनाशक फवारणीमुळे राखरांगोळी झाली आहे. शासनाने बाधित शेतकऱ्यांना नुकसान मदत देऊन दिलासा द्यावा.
योगेश चव्हाण, उपसरपंच, मेशी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com