Dhananjay Munde Property : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ; ५ वर्षात ३१ कोटी रूपये वाढले

Parali AssemblyElection : दरम्यान मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. यामध्ये ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Dhananjay Munde Property
Dhananjay Munde Propertyagrowon
Published on
Updated on

Dhananjay Munde Property Doubled : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विभानसभा निवडणुकासाठी परळीमधून गुरूवारी (ता.२४) उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार पंकजा मुंडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना घेऊन साध्या पद्धतीने अर्ज भरण्यात आला.

दरम्यान मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. यामध्ये ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रानुसार, धनंजय मुंडे यांच्याकडे २०१९ मध्ये २३ कोटींची संपत्ती होती. तर २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ५३.८० कोटींची संपत्ती दाखवण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे ३१ कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे १५ कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. तर त्यांच्या नावे १५ कोटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांचे विविध वाहने आहेत. यामध्ये टँकर, बुलेट ते मोठ्या एसयुव्ही पर्यंतच्या सात वाहनांचा समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे १९० ग्रॅम सोने असल्याचे विवरण पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Dhananjay Munde Property
Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

लाडक्या बहिणींना घेत भरला अर्ज

धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणी आणि विधान परिषद सदस्य आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह परळी मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या सोबतीने आपला उमेदवारी अर्ज परळी तहसील कार्यालयात दाखल केला. धनंजय मुंडे यांनी कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता दुपारी १ वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी सुचकाची भूमिका निभावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com