Agriculture Water : सीना नदीकाठच्या ६२ गावांत शेती अडचणीत

Agriculture Hit Due to Water : उजनी धरणातील पाणीसाठा वजा पातळीत गेल्याने भीमा-सीना जोडकालव्यातून सीना नदीत सोडले जाणारे पाणी बंद झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसला आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Madha News : उजनी धरणातील पाणीसाठा वजा पातळीत गेल्याने भीमा-सीना जोडकालव्यातून सीना नदीत सोडले जाणारे पाणी बंद झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसला आहे.

उजनी धरणातील पाणी नैसर्गिक उताराने सीना नदीत सोडता येणाऱ्या भीमा-सीना जोडकालव्याचा बोगदा २००२ मध्ये कार्यान्वित झाला. तेव्हापासून जिल्ह्यातील माढा, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, सोलापूर या भागातील शेतकऱ्यांसाठी उजनीतून ३.१५ टीएमसी पाणी बोगद्यातून सोडले जाते होते.

Water Issue
Water Issue : वैजापूर सिंचन विभागावर पाण्यासाठी आक्रोश मोर्चा

याचा फायदा होऊन ६२ गावातील सुमारे २३ हजार हेक्टर ओलिताखाली आले. यामुळे सीना नदीकाठच्या माढा, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, सोलापूर या गावातील शेतकऱ्यांनी उसासारखी नगदी पिके घेण्यास सुरवात केली. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणातील पाणी पातळी वेगाने कमी झाली. त्यातच सोलापूर जिल्ह्यात पावसानेही बराच काळ दडी मारल्यामुळे सीना नदीकाठची अनेक नगदी पिके यामुळे अडचणीत आली आहेत.

उजनी धरण वजा पातळीत गेल्यामुळे धरणातून सीना नदीत पाणी सोडणे आता शक्य नसल्याने सीना नदीकाठच्या सुमारे ६२ गावांमधील नगदी पिके यामुळे अडचणीत आली आहेत. भीमा-सीना जोडकालव्याचे खात्रीचे पाणी मिळत असल्याने सीना नदीकाठच्या लोकांनी ऊस व बागवर्गीय पिके केलेली होती. मात्र मागील काही वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस व उजनी धरण झपाट्याने रिकामी होत असल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणारी शेती अडचणीत आली आहे.

Water Issue
Kolhapur Agriculture Water : कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधील पाणी पातळी खालावली, शेतीचा पाणी प्रश्न गंभीर

या दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगामही कमी दिवसांचे भरले. त्यातच यंदा उजनीतून बोगद्यामध्ये आता यापुढे पाणी सोडणे शक्य नसल्याने ही सर्वच नगदी पिके अडचणी आलेली आहेत.

अनेक स्थलांतरित कुटुंबं गावाकडे

सीना नदी कोरडी नदी म्हणून ओळखली जात, नदीला केवळ पावसाळ्यातील काही दिवसच पाणी असायचे त्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्षच होते. त्यामुळे नदीकाठची अनेक कुटुंबे पाणी नसल्याने शेतात काही पिकत नव्हते जगण्यासाठी त्यांनी शहराकडे धाव घेतलेली होती. मात्र भीमा-सीना जोडकालवा झाल्यापासून अशी अनेक कुटुंबे गावी परतली आणि आता साधारण वीस वर्षाच्या काळात आर्थिकदृष्ट्या सुधारली आहेत. मात्र यंदा पाण्याविना शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे.

भीमा-सीना जोडकालव्याच्या बोगद्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी अनेक नगदी पिके जसे की द्राक्ष, ऊस घेतलेली होती. चार-पाच वर्षांपूर्वी बोगद्यातून खात्रीलायक पाणी मिळत होते. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बोगद्यातून मिळणाऱ्या पाण्याची अनिश्चितता वाढली आहे. यामुळे पाण्याअभावी शेती करणे अवघड आहे. शेतकऱ्याला सध्या मदतीची गरज आहे.
आनंदराज उबाळे, दारफळ (सीना), ता. माढा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com