Weather Forecast : पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून ते उत्तरेकडील भागावर १००६, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. त्यामुळे हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहण्यामुळे मोठ्या प्रमाणावर ढग महाराष्ट्राचे भूपृष्ठावर लोटले जातील.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात (Air Pressure) वाढ होत असून ते उत्तरेकडील भागावर १००६, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. त्यामुळे हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता (Rain Forecast) आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहण्यामुळे मोठ्या प्रमाणावर ढग महाराष्ट्राचे भूपृष्ठावर लोटले जातील. त्यामुळे कोकणात चांगल्या पावसाची, तर पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता (Weather Forecast) राहील.

१ जून ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या पावसाची स्थिती आणि प्रमाणावरून असे दिसून येते, की अकोला, सांगली आणि हिंगोली जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा ६ ते ८ टक्के पाऊस कमी झाला आहे; तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नंदूरबार, जळगाव, बुलडाणा, जालना, वाशीम, अमरावती, अकोला जिल्ह्यांत सरासरीहून थोडा अधिक पाऊस झाला आहे. तसेच धुळे, नाशिक, पालघर, सोलापूर, बीड, पुणे, नगर, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याचे सरासरी पेक्षा ३० टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला आहे. तर वर्धा जिल्ह्यात ६२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

कोकण ः

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (ता. १८) ३६ मि.मी. व उद्या (ता. १९) २७ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात आज ५३ मि.मी. व उद्या १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आज ५८ मि.मी. व उद्या ४२ मि.मी., ठाणे जिल्ह्यात आज ५३ मि.मी. व उद्या ५० मि.मी., पालघर जिल्ह्यात आज ३२ मि.मी. व उद्या ४३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस व किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८५ टक्के राहील.

Weather Forecast
Rain Update : पुणे जिल्ह्यात वाढला पुन्हा पावसाचा जोर

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक जिल्ह्यात आज (ता.१८) २० मि.मी. व उद्या (ता.१९) २३ मि.मी., धुळे जिल्ह्यात आज ७ मि.मी. व उद्या २६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नंदूरबार जिल्ह्यात आज १७ मि.मी. व उद्या ३९ मि.मी., जळगाव जिल्ह्यात आज ६ मि.मी. व उद्या २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ५५ टक्के राहील.

Weather Forecast
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

मराठवाडा ः

उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यांत आज (ता. १८) ९ ते १८ मि.मी., तर उद्या (ता. १९) ७ ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज २६ मि.मी. पाऊस, तर उद्या पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान बीड व औरंगाबाद जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७१ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आज (ता. १८) १० ते १६ मि.मी., तर उद्या (ता.१९) १० ते १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७१ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

यवतमाळ जिल्ह्यात आज व उद्या २१ ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आज २२ ते २७ मि.मी. व उद्या ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ किमी राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७१ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

आज चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १२ ते १३ मि.मी. तर गडचिरोली जिल्ह्यात २७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १२ ते १४ मि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६८ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज कोल्हापूर जिल्ह्यात १८ मि.मी., पुणे व नगर जिल्ह्यांत १५ ते २० मि.मी., तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ४ ते ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस व किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ८० टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतात साचलेले पाणी चर खोदून शेताबाहेर काढून टाकावे.

- पावसामुळे फळबागांमध्ये पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्याची छाटणी करावी.

- कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असताना करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com