Farmer Welfare : कृषी महोत्सवात शेतकऱ्यांची मुले विवाहबद्ध ; खर्चाला फाटा, सध्या विवाहातून सामाजिक संदेश

Agriculture Festival : शेतकरी कुटुंबातील मुलांचा विवाह अलीकडच्या काळात एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर गेल्या २० वर्षांपासून पुढाकार घेऊन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने शेकडो विवाह जमवून ते पार पाडले आहेत.
Marriage
Marriage Agrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक : शेतकरी कुटुंबातील मुलांचा विवाह अलीकडच्या काळात एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर गेल्या २० वर्षांपासून पुढाकार घेऊन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने शेकडो विवाह जमवून ते पार पाडले आहेत. तर, शुक्रवारी (ता.७) नाशिकमध्ये सुरू असलेल्या कृषी महोत्सवात साध्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे आठ विवाह पार पडले.

युथ फेस्टिवल मैदान येथे कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व दिंडोरी प्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ५००हून अधिक उपवर मुला-मुलींनी विवाहासाठी नोंदणी केली होती.

Marriage
Register marriage: खर्चाला फाटा देत त्यांनी केलं रजिस्टर लग्न!

या वेळी गुरुमाता मंदाकिनी तथा काकूसाहेब श्रीराम मोरे,  सेवामार्गाच्या कृषी शास्त्र विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यांवर होणाऱ्या उधळपट्टीला फाटा देत या विवाहाद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. सर्व आठ दांपत्याला भांड्यांचा संच कन्यादान म्हणून भेट स्वरूपात देण्यात आला.

हे झाले विवाहबद्ध

पंकज मुरमुरे-खुशी बावणे (शिर्डी), भूषण देवकर-वृषाली मवाळ(शिर्डी), आदित्य देशमुख-पल्लवी देवकर (अहिल्यानगर) सागर गावित-कल्याणी कोकणे (नंदुरबार), धनंजय मैसाने-साक्षी गाडगे (अकोला), शुभम सारडा-सारिका बजाज (परभणी), रचित सहस्रबुद्धे- शुभांगी कारसर्पे(परभणी), प्रशांत अहिरे-दीपाली (नाशिक)

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच हा उपक्रम आयोजित केला आहे. सेवामार्गाचे सारे उपक्रम हे समाज, देश आणि धर्म तसेच विश्वशांतीसाठी आहेत.

- आबासाहेब मोरे, 

कृषी शास्त्र विभागाचे प्रमुख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com