Alibag Agriculture Department : कृषी विभागाची खत पुरवठादारांवर नजर

Kharip Season : खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हींचे नियोजन आवश्यक आहे. पीक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे.
Alibag Agriculture Department
Alibag Agriculture Departmentagrowon
Published on
Updated on

MP Dhairyashil Patil : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा, सवलती त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचाव्यात, निकृष्ट दर्जाचे खतपुरवठा करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश खासदार धैर्यशील पाटील यांनी दिले.

अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा सत्यजित बढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हींचे नियोजन आवश्यक आहे. पीक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचना जावळे यांनी केल्‍या.

खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करा, तसेच शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल, यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करावे. पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Alibag Agriculture Department
Virar-Alibag Corridor : विरार-अलिबाग कॉरिडोरविरोधात पेणमधील शेतकरी आक्रमक

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी व नियोजनाचा आढावा सादर केला. या वेळी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध माहितीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले.

खरीप हंगामाचे नियोजन

- खरीप भातपिकासाठी ८१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर नियोजन

- भातपिकासाठी दोन हजार ९९५ हेक्टर उत्पादनाचे लक्ष

- खरीप हंगामातील नाचणी पिकासाठी दोन हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन

प्रत्येक कृषी सेवकाला गाव निवडून पीक क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे. पेणमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आले पीक घेण्यात यावे. हळदीचे क्षेत्र वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत.

- किशन जावळे, जिल्‍हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com