Labour Shortage : मजुरांच्या तुटवड्यामुळे इर्जिक पद्धतीने कोळपणी

Agriculture Ergic Method : करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून, मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी कोळपणी करण्यात मग्न आहेत.
Agriculture Method
Agriculture MethodAgrowon
Published on
Updated on

Solapur News : करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून, मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी कोळपणी करण्यात मग्न आहेत. सर्वांची कोळपणीची कामे एकाच वेळेस आल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी एकमेकांच्या शेतात सायकल कोळप्याने कोळपणी कामासाठी जात आहेत.

करमाळा तालुक्यात यावर्षी आतापर्यंत २१ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर उडीद तर १२ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. याशिवाय मका, कांदा, मूग, हुलगा ही पिकेसुद्धा खरिपासाठी काही शेतकऱ्यांनी निवडलेली आहेत.

Agriculture Method
Fertilizing Crop Method : पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती

पोफळज, झरे, खडकेवाडी, वीट, कुंभेज, कोंढेज परिसरात सध्या तूर आणि उडीद पिकांची कोळपणी शेतकऱ्यांनी सुरू केली असून, सध्या शेतकऱ्यांकडे सर्वत्र बैलांची संख्या कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या ट्रॅक्टरच्या साह्याने केल्या आहेत. पेरण्या ट्रॅक्टरने शक्य असल्या तरी या पिकांमध्ये तण झाल्याने त्याची कोळपणी खुरपणी करण्याची गरज आहे ती ट्रॅक्टरच्या साह्याने करणे शक्य नसल्याने शेतकरी सर्वत्र हात कोळपे यांचा व सायकल कोळपे यांचा वापर करून या पिकांमधील तण काढण्याचे काम करत आहेत.

एकाच वेळेस सर्व शेतकऱ्यांची कोळपणी आल्याने मजुरांची टंचाई भासत असून, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या शेतामध्ये इर्जिक पद्धतीने कोळपणी करण्यासाठी जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. यावर्षी पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची उगवण चांगली झाली आहे.

Agriculture Method
Labour Issue : ‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ

इर्जिक पद्धत म्हणजे काय?

मजुरांच्या कमतरतेमुळे शेताच्या मशागतीस उशीर होऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याने अन्य शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कोळपणी वा इतर मशागतीची कामे करायची त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या शेतात याच शेतकरी गटाने जाऊन कामे करण्याच्या पद्धतीला इर्जिक पद्धत म्हणतात. यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत नाही आणि सर्वांच्याच शेताची मशागत होते.

करमाळा तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पूर्व भागात शेतकऱ्यांनी खरिपासाठी उडीद व तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. कोळपणीबरोबरच जोमदार पिकासाठी तुरीबाबत शेतकऱ्यांनी ४५ व ६० दिवसांनी शेंडा खुडावा तर उडीद पिकावरील खोड माशी करिता थायामेथोक्समची फवारणी करावी.
संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा
समाधानकारक पावसामुळे यावर्षी खरिपासाठी उडीद व तुरीचे पीक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. उडीद पिकांची उगवण काही ठिकाणी कमी झाली आहे. सध्या खरिपाची सर्वच पिके एकाच वेळी कोळपणीसाठी आली आहेत. कोळपणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतातील कामे करत आहेत.
सूर्यभान इंगोले, शेतकरी, कोंढेज, ता. करमाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com