
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता.१८) परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रावर विद्यापीठाने संशोधित केलेल्या व उत्पादित केलेल्या खरीप पिकांच्या बियाणे विक्रीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध पिकांच्या एकूण ४०० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. लवकरच मराठवाड्यातील इतर ७ जिल्ह्यांमध्ये बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळबांडे यांनी दिली.
कुलगुरू प्रा. डॉ. इंद्रमणी, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रगतिशील शेतकरी सुधीर अग्रवाल, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, बीजप्रक्रिया केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे आदींच्या उपस्थितीत बियाणे विक्रीचे उद्घाटन झाले. मराठवाड्यातील जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी रांग लावून बियाण्याची खरेदी केली.
पहिल्या दिवशी विक्री झालेल्या बियाण्यामध्ये सोयाबीन ३०० क्विंटल, तूर ९० क्विंटल, मूग १० क्विंटल, ज्वारी १ क्विंटल, कपाशी १.५० क्विंटल मिळून एकूण ४००.०२ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. खरीप ज्वारीचा जैव संपृक्त वाण (परभणी शक्ती), मूग (बीएम २००३-२), तूर (लाल) बीडीएन ७१६, बीएसएमआर ७३६, तूर (पांढरी) बीडीएन ७११, बीएसएमआर ८५३, गोदावरी, सोयाबीन ः एमएयूएस १६२, एमएयूएस १५८, एमएयूएस ६१२, भरडधान्यामध्ये राळा व नाचणी, कपाशीचे सरळ वाण ः एनएच १९०१ बीटी, एनएच १९०२ बीटी, कपाशी देशी वाण ः पीए ८१० या वाणांच्या बियाण्याची विक्री झाली.
इतर ७ जिल्ह्यांतही उपलब्ध होणार बियाणे...
विद्यापीठाच्या परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रावर कार्यालयीन वेळेत बियाणे विक्री सुरू आहे. लवकरच नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्र, तुळजापूर (जि. धाराशिव), खामगाव (जि. बीड), छत्रपती संभाजीनगर, बदनापूर (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्र, अंबेजोगाई (जि. बीड), गोळेगाव (जि. हिंगोली) येथील कृषी महाविद्यालय या ठिकाणी बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, असे डॉ. काळपांडे यांनी सांगितले.
राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी घरे पडल्याच्या घटना घडल्या.
परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू तालुक्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
सातारा जिल्ह्यात पावसामुळे कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाइल टॉवर कोसळून एक जण जखमी झाला.
कोल्हापूर जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे पावसामुळे झाडे पडल्याच्या
घटना घडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.