Farmer Movement : बंदिस्त पाइपलाइन कामांना गतीसाठी रविवारपासून ठिय्या

Indefinite Agitation : १२ गावांच्या योजनेच्या निविदा प्रक्रियेला त्वरित मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, तालुक्यातील बंदिस्त पाइपलाइनच्या कामांना गती द्यावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पाणी चळवळीच्या बैठकीत घेतला.
Pipeline Work
Pipeline WorkAgrowon

Sangli News : आटपाडी तालुक्यातील वंचित १२ गावांच्या योजनेच्या निविदा प्रक्रियेला त्वरित मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, तालुक्यातील बंदिस्त पाइपलाइनच्या कामांना गती द्यावी, या मागणीसाठी २५ तारखेपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पाणी चळवळीच्या बैठकीत घेतला. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

श्रमिक मुक्ती दल आणि पाणी चळवळीतर्फे डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली लिंगीवरे येथे झालेल्या पाणी परिषदेत नव्याने समावेश केलेल्या बारा गावांच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामासाठी निधी द्यावा, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

Pipeline Work
Fodder Transport Ban : अकोल्यात चारा टंचाई, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चारा वाहतूक बंदीचे आदेश

या पार्श्‍वभूमीवर आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भिंगेवाडीत बैठक झाली. जनार्दन झिंबल, हणमंतराव देशमुख, साहेबराव चवरे, सादिक खाटीक, नानासाहेब माळी, शंकर ढोले, अरुण तेली, नंदकुमार इनामदार, एच. बी. गुरव, नाथा बाड, मनोहर विभूते, महादेव देशमुख, मोहनराव भोसले, खाशाबा खताळ, शंकर गळवे उपस्थित होते.

Pipeline Work
Ujani Pipeline : उजनी पाइपलाइनसाठी २६७ कोटींचा निधी देणार

आटपाडी तालुक्यातील लाभक्षेत्रात समन्यायी पाणीवाटप तत्त्वावर समाविष्ट केलेल्या १२ गावांना समाविष्ट केले आहे. संबंधित गावांत सर्व बाबींची पूर्तता करून काम सुरू करण्याची मागणी आहे.

उर्वरित गावांत बंद पाइपलाइनची वितरण व्यवस्था ९० टक्के पूर्ण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर निविदेला मंजुरी देऊन निधी उपलब्ध झाला तर तालुक्यातील गावे सिंचनाचा लाभ घेऊ शकतील. बारा गावांच्या कामासाठी अर्थसंकल्पात निधीच्या मागणीसाठी रविवारपासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com