Land Distribution : जमिनी वाटपास सुरुवात न केल्यास कोयनानगरला १३ फेब्रुवारीला ठिय्या

Koyana Dam : मेळाव्यात धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘कोयना धरणग्रस्तांचा १३ फेब्रुवारीला विजयोत्सव किंवा निर्णायक लढा तरी सुरू होईल.
Koyna Dam
Koyna DamAgrowon

Satara News : पुनर्वसनमंत्र्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांची प्रशासकीय अपरिहार्य कारणामुळे रद्द केलेली बैठक १२ फेब्रुवारीपर्यंत घेऊन विषयपत्रिकेतील अन्य विषयांसह पसंती दिलेल्या जमिनी वाटपास सुरुवात न केल्यास १३ फेब्रुवारीला कोयना धरणग्रस्त बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करतील, असा इशारा कोयना धरणग्रस्तांनी मेळाव्यात सरकारला दिला.

मेळाव्यात धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘कोयना धरणग्रस्तांचा १३ फेब्रुवारीला विजयोत्सव किंवा निर्णायक लढा तरी सुरू होईल. २०१८ पासून पाच वेळा बेमुदत आंदोलने या प्रकल्पग्रस्तांनी केले.

Koyna Dam
Koyna Water Issue : कोयनेच्या हक्काच्या पाण्याचा वाद मिटणार का?

त्याच्या परिणामी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठका होऊन जमीन पसंती केल्या. त्यास आठ ते अकरा महिने पूर्ण झाले.

Koyna Dam
Koyna Water Dispute : कोयनेतील पाण्याचा वाद पेटणार

तरीही आजतागायत जमीन वाटप सुरू केलेले नाही. ६५ वर्षे या जनतेला वनवास भोगावा लागला आहे. आता कुठे लढा, आंदोलने करून प्रश्न सोडवणूक होण्याला सुरुवात होत असताना प्रशासन, शासन चालढकल करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. त्यामुळे जनतेला लढण्याशिवाय पर्याय नाही. सरकार जर लढल्याशिवाय पुढे सरकणार नसेल, तर आम्ही लढू; पण आता माघार घेणार नाही.

’’ यावेळी श्रीपती माने, निवृत्ती सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. हरिश्चंद्र दळवी यांनी कोयना धरणग्रस्तांच्या लढ्याचा इतिहास सांगितला. महेश शेलार यांनी प्रास्ताविक केले. संतोष गोटल, सचिन कदम, राम कदम, पी. डी. लाड, सीताराम पवार, किसन सुतार, विनायक शेलार, शिवाजी कांबळे, महादेव यादव, परशुराम शिर्के, जयराम कांबळे, दाजी पाटील, राजाराम जाधव, अनसुया कदम, गाजराबाई खराडे, शुभांगी लाड, विमल सुतार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com