Agriculture Land : जमिनींसाठी शेतकरी आक्रमक

Aggressive Farmer Reaction : वैतरणा धरणासाठी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत करा त्याशिवाय वैतरणाचे पाणी मुकणे धरणात घेऊ देणार नाही असा इशारा इगतपुरी तालुक्यातील आवळी, सातुर्ली, आहुर्ली, गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
Manikrao Khule
Manikrao KhuleAgrowon

Nashik News : वैतरणा धरणासाठी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत करा त्याशिवाय वैतरणाचे पाणी मुकणे धरणात घेऊ देणार नाही असा इशारा इगतपुरी तालुक्यातील आवळी, सातुर्ली, आहुर्ली, गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

तसेच जोपर्यंत आमच्या जमिनी परत देत नाही तोपर्यंत पाणी देण्यासही शेतकऱ्यांनी दर्शवीत धरण परिसरात सुरू असलेले काम देखील बंद पाडले. वैतारणा धरणाच्या आहुर्ली आवळी दरम्यान मातीचे धरण बांधण्यासाठी आजूबाजूच्या गावातील जमीन माती खाणीसाठी संपादित करण्यात आल्या. काही प्रमाणात तेथून माती वापरली.

Manikrao Khule
Agriculture Research : कृषी संशोधनासाठी ‘फेलोशिप’ची मागणी

परंतु बांदासाठी आवश्यक माती बांदाजवळच बुडीत क्षेत्रात उपलब्ध असल्याने संपादित जमिनीतील माती विभागाने वापरली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या या जमिनी होत्या. त्यांनी तिथेच शेती करण्यास सुरवात केली. अनेक शेतकरी बागायती पिके घेतात. शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासनाने जमिनी मुळ मालकांना परत कराव्या यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही.

Manikrao Khule
Memorandum of Understanding : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ४६६१ कोटींचे सामंजस्य करार

शेतकऱ्यांकडून ठिय्या

पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तात वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी मुकणे धरणात वैतरणा धरणाच्या आवळी जवळ मातीच्या धरणाला गेट बांधून त्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र हा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे.

विभाग रात्री काम सुरू करतील म्हणून शेतकरी धरणावर २४ तास ठिय्या मांडून बसले आहे. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहे. शेतकरी आक्रमक झाल्याने काम थांबवले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या नावाचा सातबारा दिला जात नाही. तोपर्यंत पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com