Jowar Shalu Prices
Jowar Shalu Pricesagrowon

Jowar Shalu Prices : कांद्यानंतर आता ज्वारी, शाळूच्या दरात घसरण; १५ रुपयांनी दर पडले

Jowar Shalu : मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे.
Published on

Jwari Rate : मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात किलोमागे पाच रुपये, शाळू होलसेल बाजारात १५ रुपये कमी झाले आहेत.

याचबरोबर लाल मिरचीची आवकही चांगली वाढल्याने यंदा दर निम्म्यावर आले आहेत. गोडेतेलाचे दर स्थिर असून, साखर ४२ रुपयांपर्यंत स्थिर आहे. यामुळे बाजारात कांदानंतर आता ज्वारीचे दर पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता. ज्वारी ४५ ते ६०, तर शाळू ९० रुपये किलोपर्यंत दर पोहचले होते. मात्र, रब्बी हंगामातील पिके चांगली असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसतो. ज्वारीमध्ये प्रतिकिलो पाच रुपये, तर शाळूच्या दरात पंधरा रुपयांची घसरण झाली आहे.

तूरडाळ, हरभरा डाळ, मसूरडाळीसह इतर कडधान्याच्या दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. शेंगदाणा, साबूदाण्याचे दर स्थिर आहेत. साखरेच्या दरात फारशी वाढ नसली तरी जाडी साखर ४२ रुपये किलो आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 'ब्याडगी' मिरची गेल्या वर्षी ६५० रुपये किलो होती, तो दर आता ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. आगामी दोन महिन्यात दरात आणखी घसरण होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

Jowar Shalu Prices
Rabi Jowar : राज्यातील चाळीस टक्के ज्वारीचे क्षेत्र अडचणीत

गूळ तेजीत

गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, आवक चांगली असली तरी दर तेजीत आहे. किरकोळ बाजारात ५० रु. किलो दर आहे.

ज्वारीचे दर प्रतिकिलो असे

वसंत ज्वारी ४०

महिंद्रा ज्वारी ४५

शाळू ७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com