Paddy Farming : विविध प्रयोगातून भात शेतीत प्रगती

Paddy Crop : रत्नागिरी जिल्ह्यात राजवाडी (ता. संगमेश्‍वर) येथील संतोष भडवळकर यांची वडिलोपार्जित सुमारे दीड एकर शेती आहे. भाडेतत्त्वावर एक एकर शेती घेतलेली आहे. अशी अडीच एकर क्षेत्रामध्ये ते भात लागवड करतात.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः संतोष भडवळकर
गाव ः राजवाडी, ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी
भात क्षेत्र ः अडीच एकर
काजू लागवड ः अर्धा एकर

Paddy Cultivation : रत्नागिरी जिल्ह्यात राजवाडी (ता. संगमेश्‍वर) येथील संतोष भडवळकर यांची वडिलोपार्जित सुमारे दीड एकर शेती आहे. भाडेतत्त्वावर एक एकर शेती घेतलेली आहे. अशी अडीच एकर क्षेत्रामध्ये ते भात लागवड करतात. पारंपरिक पद्धतीने भातशेती करतानाच विविध प्रयोग करणारा शेतकरी म्हणून संतोष भडवळकर यांची ओळख आहे.

वातावरणातील बदलाचा अंदाज घेऊन दरवर्षी शेतीचे वेळापत्रक ते ठरवतात. यंदा उशिराने पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज आल्यानंतर दहा दिवस उशिराने भात पेरणी त्यांनी केली. तसेच जमिनीचा बिघडलेला पोत सुधारण्यासाठी खतांमध्येही थोडा बदल केला आहे.

रोपवाटिका नियोजन ः
- भातशेतीसाठी मे महिन्याच्या अखेरीस जमिनीची भाजावळ केली जाते. त्यासाठी काजूच्या बागेतील पालापाचोळा गोळा करून तो शेतामध्ये रचून ठेवतात. त्यानंतर तो पेटवून दिला जातो. भाजावळ केल्यामुळे भात लागवडीनंतर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो असे संतोषराव सांगतात.
- भात लागवडीसाठी दरवर्षी कोलम वाणाचे संकरित बियाण्यांचा वापर ते करतात. मात्र या वर्षी भात संशोधन केंद्राने विकसित केलेले रत्नागिरी ८ आणि तीन खासगी कंपनीच्या वाणांची निवड केली आहे.
- रोपवाटिका निर्मितीसाठी पावसाचा अंदाज घेऊन जमिनीची मशागत केली.
- अडीच एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यासाठी त्यांनी १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली. साधारण ५ जूनला भात बियाण्यांची पेरणी केली. पेरणीपूर्वी बियाण्यांस शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया केली. तसेच रुजवण क्षमता वाढविण्यासाठी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया बियाण्यांस केली.
- १० गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिकेसाठी साधारण २० किलो बियाणे लागले.
- पेरणीनंतर साधारण ५ दिवस पाऊस झाला नाही. साधारण १० जूनच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्याचा रोपवाटिकेतील रोपांना फायदा झाला. त्यानंतर अधूनमधून पडलेल्या हलक्या सरींमुळे रोपांना उभारी मिळाली. या वर्षी भात लागवड करण्याइतका पाऊस झालेला नाही.

Paddy Farming
Silk Farming : आभ्यासातून रेशीम शेतीत साधली प्रगती

पुनर्लागवड नियोजन ः
- साधारण २२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनच्या पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या वेळी भात रोपांच्या पुनर्लागवडीसाठी जमिनीची मशागत करण्यास सुरुवात केली.
- जमिनीची पॉवर टिलरच्या साह्याने उभी आडवी नांगरणी करून घेतली. जमीन चांगली तयार केल्यानंतर साधारण १ जुलैच्या दरम्यान लावणीस सुरुवात केली. गावातील शेतकरी भात लावणीच्या काळात एकमेकांकडे भात लावणीसाठी जातात. त्यामुळे मजुरीवरील खर्चात मोठी बचत होते.
- भात रोप लावणीवेळी युरिया आणि १५ः१५ः१५ ही रासायनिक खते दिली. या वर्षी खतांच्या बेसल डोसमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. दरवर्षी ५ किलो युरियाची मात्रा दिली जाते. मात्र जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढल्यामुळे ती कडक होत आहे. त्यामुळे यावर्षी युरियाची मात्रा कमी करून २५ टक्के केली आहे.
- रोपांची पुनर्लागवड दोन काडी पद्धतीने केली. साधारणपणे १४ जुलैपर्यंत पुनर्लागवडीचे काम सुरू होते.

Paddy Farming
Paddy Farming : भाताच्या विविध वाणांची लागवड करणारे गाव

- पुनर्लागवडीच्या १५ दिवसांनी पुन्हा रासायनिक खतांचा दुसरा डोस प्रति गुंठा दीड किलो प्रमाणे दिला.
- जुलै महिन्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भातशेतीला पोषक स्थिती होती. या काळात भात लागवडीत बऱ्यापैकी तण वाढले होते. ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली. त्या काळात गवत काढून घेतले. यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होत असल्याचे भडवळकर सांगतात.
- मागील काही दिवसांपासून पावसात बऱ्यापैकी उघडीप आहे. कडकडीत ऊन पडत आहे. तर काही वेळा ढगाळ हवामान अशी स्थिती आहे. अशा विषम हवामानामुळे रोपे पिवळी पडण्याची
शक्यता असते. पाऊस पडलाच नाही तर पंपाने पाणी शेतात आणून देण्याचा पर्याय तयार ठेवला होता. परंतु २५ ऑगस्टपासून हलक्या सरी पडल्या. त्यामुळे सिंचनाची आवश्यकता भासली नाही. अशीच स्थिती राहिल्यास, भातशेती व्यवस्थित राहील.

पुढील २० दिवसांचे नियोजन ः
- पावसाचा अंदाज घेऊन भात खाचरात पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यावर भर दिला जाईल.
- भात लागवडीत या काळात खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यकता भासल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल. सध्या तरी भात लागवडीत कोणताही प्रादुर्भाव दिसून येत नाही.
- साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भात रोपातून पोटरी बाहेर येण्यास सुरुवात होते. या काळात पिकामध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील.
- निवडलेले वाण हे साधारण १३० ते १३५ दिवसांमध्ये पक्व होते. दुधाचे दाणे तयार होऊ लागल्यावर पक्ष्यांपासून दाण्याचे संरक्षण करणे गरजेचे असते. त्यासाठी शेतामध्ये बुजगावणी उभारली जातील.

अपेक्षित उत्पादन ः
- दरवर्षी हंगामात साधारण ५० मण भात उत्पादन मिळते. उत्पादित भातापैकी घरी खाण्यापुरता भात शिल्लक ठेवून उर्वरित भाताची खरेदी विक्री संघाकडे विक्री केली जाते. त्यामुळे चांगला दर मिळतो.

भाजीपाला लागवडीत सातत्य ः
भात कापणी पूर्ण झाल्यावर दरवर्षी भाजीपाला लागवडीचे नियोजन केले जाते. विशेषतः टोमॅटो, विविध भाजीपाला पिके, कलिंगड, फ्लॉवर, पडवळ, काकडी यासारख्या पिकांची लागवड केली जाते. सर्व उत्पादित मालाची जवळच्या बाजारात विक्री केली जाते. दरवर्षी सुमारे दोन ते अडीच किलो कलिंगडांची विक्री ते करतात. त्यातून चांगले उत्पन्न हाती येत असल्याचे भडवळकर सांगतात. याशिवाय त्यांची काजूची बागदेखील आहे. त्यात वेंगुर्ला आणि गावठी जातीची मिळून ६० झाडे आहेत. त्यातून वर्षाला साधारण १०० ते १२५ किलो काजू बी उत्पादन मिळते.

- संतोष भडवळकर, ९५२९१९३२७४, ९६५७९६६४५२
(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com