Crop Insurance : नुकसानीपोटी १७९ कोटींवर अग्रिम विमा

Agrim Pik Vima : हिंगोली जिल्ह्यात एकूण १७९ कोटी ८१ लाख ४५ हजार रुपयांवर अग्रिम विमा मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा केली जात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News : हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती स्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीम बाबीअंतर्गंत सोयाबीनच्या नुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ११ हजार ५४७ पिकविमाधारक शेतकऱ्यांना १५८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपये आणि सर्वव्यापी स्थानिक आपत्ती (वाईड स्प्रेड लोकल कॅलेमिटीज) या जोखीम बाबी अंतर्गंत तूर व कापूस या पिकांसाठी १ लाख ४० हजार ९१२ शेतकऱ्यांना २१ कोटी १५ लाख ८० हजार रुपये अग्रिम पीकविमा मंजूर झाला आहे.

जिल्ह्यात एकूण १७९ कोटी ८१ लाख ४५ हजार रुपयांवर अग्रिम विमा मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा केली जात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

Crop Insurance
Crop Insurance : भात नुकसानीपोटी २५ टक्के अग्रिम मिळणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे पीकविमा कंपनीला आदेश

हिंगोली जिल्ह्यात २ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कपाशी आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकांचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जोखीम बाबीअंतर्गंत जिल्ह्यातील सर्व मंडळातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या संभाव्य विमा रकमेपैकी २५ टक्के अग्रिम विमा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १६ सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना काढली.

एच. डी. एफ. सी. ईरगो विमा कंपनीला संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ (अग्रिम) रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना १ महिन्याच्या आत देण्याचे आदेश काढले होते. परंतु राज्य शासनाकडील शेतकरी विमा हप्त्याचे अनुदान थकीत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम विम्यासाठी तब्बल सहा महिने प्रतिक्षा करावी लागली.

हिंगोली जिल्हा सोयाबीन मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अग्रिम विमा स्थिती

तालुका शेतकरी संख्या अग्रिम विमा दावा रक्कम

हिंगोली ६०६३२ ३० कोटी १८ लाख ७२ हजार ३२३ रुपये

कळमनुरी ५९७०० ३४ कोटी४८ लाख ५९ हजार ९१९ रुपये

वसमत ६९४४६ २८ कोटी ९९ लाख ९० हजार ५१९ रुपये

औंढा नागनाथ ५०६७२ २६ कोटी ८३ लाख ६९ हजार २८१ रुपये

सेनगाव ७११९९ ३८ कोटी १४ लाख ७३ हजार २७ रुपये

हिंगोली जिल्हा वाईडस्प्रेड लोकल कॅलिमेटी (डब्लू.एस.एल.) विमा स्थिती

तालुका शेतकरी विमा रक्कम

हिंगोली २६८८७ ३ कोटी ७९ लाख रुपये

कळमनुरी १९१६९ ३ कोटी २८ लाख रुपये

वसमत २६२८२ ४ कोटी ५८ लाख रुपये

औंढानागनाथ ३२९९० ४ कोटी २९ लाख रुपये

सेनगाव ३८५८४ ५ कोटी २१ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com