
ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली ः पाण्याची उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातच चारा पिकाची लागवड झाली आहे. त्यामुळे ३ कोटी ३५ लाख २५ हजार ५६५ टन इतका चाऱ्याची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा चारा टंचाई भासणारच नाही, असा दावा संबंधित विभागाच्या सूत्रांनी केला आहे.
जिल्ह्यात लहान १,५६,३७७, मोठी ६,६२,३८१ तर शेळ्या मेंढ्या ५,८४,८७९ असे एकूण १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जत तालुक्यात ३,५४,७६५ जनावरांची संख्या असून जत तालुक्यात सर्वाधिक जनावरांची संख्या आहे. गत वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी चारा पिकाकडे वळाले. संबंधित विभागाकडून ४ कोटीचे २४४ टन १९ हजार ७०० शेतकऱ्यांना मोफत चाऱ्याच्या बियाणचे वाटप केले आहे.
१६४०० हेक्टरवर चारा पिकांची पेरणी झाली असून १ लाख ६५ टन चाऱ्याचे उत्पादन मिळणार आहे. जानेवारीच्या महिनाअखेर ३ कोटी १५ लाख ९५ हजार ५४९ टन इतका चारा उपलब्ध होता. सरासरी १५७१ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध होता. जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. ज्या भागात योजनांचे पाणी पोहोचले आहे, अशा ठिकाणी चारा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
ओला चारा मोठ्या जनावरांना प्रतिदिन १८ किलो, तर छोट्या जनावरांना नऊ किलो आणि शेळ्या मेंढ्यांसाठी तीन किलो चारा लागतो.सुका चारा लहान जनावरांसाठी प्रति दिन ३ किलो, मोठ्या जनावरांसाठी ६ किलो, शेळ्या मेंढ्यांसाठी एक किलो चाऱ्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील १४ लाख जनावरांना जनावरांना १५ हजार ०८५ टन ओला चारा लागतो. सुका चारा ५ हजार ०५२ टनाची गरज आहे. ३ कोटी ३५ लाख २५ हजार ५६५ टन इतका चारा उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय जनावरांची संख्या व उपलब्ध चारा
तालुका पशुधन संख्या उपलब्ध चारा (टनात) दिवस
आटपाडी १४९८१७ ३२८९९३४ २१४३
जत ३५४७६५ १३१०८६९५ ३३२२
तासगाव १२५३५३ २१२१३२२ १०७९
खानापूर ९६५३२ १७२१२०० १२५१
कवठेमहांकाळ १४०९९२ ४११७८२५ २२२३
कडेगाव ८१०९८ १४५९१५६ ११३६
मिरज १४३८९३ ४४२४५१३ १८७६
पलूस ७३९३१ ४५५६५१ ३५६
शिराळा ८११३५ १२७६६५९ ७७४
वाळवा १५६११७ १५५०६०९ ५४१
एकूण १४०३६३३ ३३५२५५६५ १६६७
सन २०२४- २५ या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटींचे चारा बियाणे शेतकऱ्यांना मोफत दिले आहे. सन २०२५- २६ या वर्षासाठी १० कोटी जिल्हा नियोजन समितीद्वारे चारा बियाण्यासाठी तरतूद होणार आहे.
- डॉ. अजयनाथ थोरे, उपायुक्त, पशुसंवर्धन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.