Agriculture
AgricultureAgrowon

Rainfed Agriculture : कोरडवाहू क्षेत्रात एकात्मिक शेतीचा अवलंब करा

Integrated Agriculture Management : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या मुल्यांकनाकरीता पंचवार्षिक समीक्षा समिती आली होती.
Published on

Parbhani News : शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीत हवामान बदलानुरुप विहीर व कूपनलिका पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पद्धत, शेततळे व त्यातील पाण्याचा पुनर्वापर, विविध आंतरपीक पद्धती तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल असा सूर बाभूळगाव (ता. परभणी) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उमटला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या मुल्यांकनाकरीता पंचवार्षिक समीक्षा समिती आली होती. या समितीने १० वर्षापासून परभणी तालुक्यातील ३ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रमांची भेट देऊन पाहणी केली. बाभूळगाव येथे शेतकरी मेळावा, चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली.

Agriculture
Rainfed Crop Planning : कोरडवाहू क्षेत्रावर खरीप पीक नियोजन कसं कराल?|Agrowon | ॲग्रोवन

यावेळी कुलगुरू डॉ.इंद्र मणी मिश्रा, भुवनेश्वर येथील ओडीसा कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. एन. पशुपालक, ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषी विद्यापीठाचे माजी. कुलगुरू डॉ. ए. के. सिंग, सदस्य सचिव डॉ. जी. रवींद्र चारी, प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल. उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. आनंद गोरे, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. मदन पेंडके, डॉ. पपिता गौरखेडे आदी उपस्थित होते.

Agriculture
Rainfed Farming : कोरडवाहू शेती तंत्रज्ञानात सुधारणेसाठी सूचना अपेक्षित

शेतकऱ्यांच्या शेतावरील विहीर व कूपनलिका पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पध्दत, शेततळे, पाण्याचा पुनर्वापर, विविध आंतरपीक पद्धती तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती याची भेट देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले. या मेळाव्यास ज्ञानोबा पारधे, भारत आव्हाड, कृष्णा पारधे, बाबासाहेब पारधे, शिवाजी दळवे बाभूळगाव, उजळांबा, सोन्ना येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीने ताडकळस येथील गजानन अंभुरे यांच्या शेतावर भेट देवून रुंद वरंबा सरी पद्धतीवर पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com