Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची मुदत ११ फेब्रुवारी रोजी संपली असून, या सर्व ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे..जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर यापूर्वीच प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२५ पूर्वी होणे आवश्यक होते; मात्र त्या झालेल्या नाहीत. याशिवाय अनेक ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्यांच्या निवडणुकादेखील वर्ष-दीड वर्षांपासून झालेल्या नाहीत..Gram Panchayat Fund: सोलापूर जिल्ह्यातील ९७१ गावांना ११५ कोटींचा निधी .त्यातच आता जिल्ह्यातील आणखी ७० ग्रामपंचायतींची मुदत १० आणि ११ फेब्रुवारी रोजी संपली आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील २३, वैभववाडी तालुक्यातील ११, कुडाळ तालुक्यातील ९, मालवण तालुक्यातील ६, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येकी तीन, तर वेंगुर्ला तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे..जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, त्यापाठोपाठ दहावीची परीक्षाही होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणखी एक-दोन महिने होण्याची शक्यता नाही. परिणामी, पुढील काही महिने ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती राहणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.