Adhala Dam : अकोला तालुक्यातील आढळा धरण भरले; शेतकरी सुखावला

Dam Water Level : अकोले तालुक्यातील देवठाण येथील एक टीएमसी क्षमतेचे आढळा धरण गुरुवारी (ता. ३) दुपारी १२ वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे.
Adhala Dam
Adhala DamAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील देवठाण येथील एक टीएमसी क्षमतेचे आढळा धरण गुरुवारी (ता. ३) दुपारी १२ वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे.

यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. सध्या ६० क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण भरले असल्याने शेतकरी बांधव प्रचंड खूष आहेत. रब्बी पिकांना पाण्याची व्यवस्था झाली आहे.

Adhala Dam
Dam Water Level : सोलापूर जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत ७५ टक्के जलसाठा

अकोले तालुक्यातील देवठाण वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर व चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी व कासारवाडी ही गावे अशा १६ गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते.

Adhala Dam
Mula Dam Water Storage : मुळा धरण पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर

याशिवाय पाच गावांची पाणीपुरवठा योजनांना या धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

यंदा लवकर भरले

अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण भरल्यानंतर आढळा धरण भरण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु यावर्षी आढळा धरण अगोदर भरले असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com