
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात सध्या सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे, याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अॅड. जगदीश धायतिडक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी त्यांना योग्य पद्धतीने करता येतील, त्याचा वेळेत निपटारा होऊन त्यांना समाधान मिळेल व गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरिता ‘आपले सरकार’ पोर्टल सुरू केले आहे.
त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्याचा वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले. अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांनीही सुशासनाचे महत्त्व सांगून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारींच्या वेळेत निपटारा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.
तक्रार निवारणासाठी क्यूआर कोड
प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत एक क्यूआर (QR) कोड तयार करावा. हा कोड त्या तहसील कार्यालयातील प्रत्येक गावापर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचल याची काळजी घ्यावी. हा क्यू आर कोड स्कॅन करून त्या तहसील कार्यालय व तालुकास्तरीय यंत्रणाबाबत नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील, त्या तक्रारी नागरिकांमार्फत केल्या जातील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.