Electricity rate hike : मे महिन्यात बसणार ३० लाख ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक 

Electricity price hike by Tata company : राज्यात उष्णतेच्या झळा वाढल्या असतानाच आता वीज दरवाढीचा शॉक ३० लाख ग्राहकांना बसणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज बिलात होणाऱ्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
Electricity
ElectricityAgrowon

Pune News : राज्यासह देशात उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पारा ४० शी पार गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांसह जनावरांचे देखील हाल होत आहेत. अंगाची होणार लाही रोखण्यासाठी रात्रंदिवस फॅन आणि एसी लावले जात आहेत. यामुळे काहीसा दिलासा मिळत असतानाच टाटा कंपनीने वीज दरात वाढ केल्यानंतर आता अदानी पावर कंपनीकडून वीज दरवाढ करण्यात येणार आहे. दरवाढीचा थेट फटका मे महिन्यात ३० लाख ग्राहकांना बसणार आहे. 

राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असतानाच मराठवाडा, विदर्भ आणि राज्याच्या विविध जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबईसह कोकणात ठाण्यात उष्ण हवामानाचा इशारा दिला असताना वाशीम येथे उष्णतेची लाट उसळली आहे. तर अनेक ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सियस गाठले असून घराघरात फॅन, एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने वीजेची मागणी मागणी वाढली आहे. 

Electricity
Mahavitran Electricity Rate : वीज दरवाढीचा झटका! आजपासून नवे दर लागू

दरम्यान अदानी वीज कंपनीची वीज महागल्याने सुमारे ३० लाख वीज ग्राहकांना फटका बसणार आहे. मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या वीज बिलात वाढ होणार असून प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे. ही दरवाढ इंधन अधिभारात करण्यात आली आहे. 

कशी असणार वीज दरवाढ

० ते १०० युनिटसाठी - ७० पैसे प्रति युनिट

१०१ ते ३०० युनिटसाठी - १.१० रुपये प्रति युनिट

३०१ ते ५०० युनिटसाठी १.५ रुपये प्रति युनिट

५०० हून अधिक वीज वापर झाल्यास इंधन अधिभार १.७० रुपये आकारला जाणार आहे

Electricity
Agriculture Electricity : कृषी पंपाच्या पाच हजार नव्या वीज जोडण्या रखडल्या

अधिभाराची रक्कम ग्राहकांच्या खिशातून 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या यंदा पाण्याची टंचाई लवकर भासू लागली आहे. याचा थेट परिणाम हा वीज निर्मितीवर होत असल्याने इंधन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे नुकसान होत असल्याने वीज कंपन्यांचे म्हणणे आहे. तर राज्य वीज नियामक आयोगापुढे अदानी कंपनीने ३१८ कोटी ३८ लाख रुपये वसूल करण्याठी प्रस्ताव दिला होता. 

तसेच ही रक्कम  इंधन अधिभारातून वसूल करण्यात येईल असे देखील स्पष्ट केले होते. यानंतर आता प्रस्तावाला आयोगाने मंजूरी दिली आहे. यामुळे इंधन अधिभाराची ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत ग्राकांकडून वसूल केली जाईल. यामुळे वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असतानाच आता इंधन अधिभाराचा भार देखील सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com