sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यातील जत हा कायम दुष्काळी तालुका आहे. तालुक्यातील बेवणूर हे शेवटचे गाव शेतकऱ्यांचा पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे.
गावातील दगडू मच्छिंद्र लोखंडे यांनी दुष्काळासोबतची लढाई देत मेंढी पालन करत एक एक रुपया साठवला यातून मोठा दूग्ध व्यवसाय उभारला आहे.
काही काळ नोकरी केली परंतु यातून काही मिळत नसल्याने त्यांनी दुग्ध व्यवसायातून पुढे जाण्याची संधी शोधून यामध्ये चांगील वाटचाल केली.
जनावरांच्या बाजारातून २००३-०४ च्या दरम्यान एचएफ संकरित दोन गायी खरेदी केल्या.
सांगोला, सांगली, कोल्हापूर या भागांतील गोठ्यांना भेटी देत व्यवसायातील बारकावे, तंत्र जाणून घेतले.
पहाटेपासून रात्रीपर्यंत अव्याहत कष्ट, कुशल व्यवस्थापन, उत्तम आर्थिक नियोजन लोखंडे प्रगतीच्या वाटेवरून आत्मविश्वासपूर्वक चालू लागले.
सुमारे वीस वर्षांच्या काळात गोठ्यातच जनावरांची पैदास केली. एकेकाळच्या दोन गायींवरून आज तब्बल ४५ गायींचा गोठा उभारला आहे.
दगडू व कविता या लोखंडे दांपत्याने एकही मजूर न ठेवता केवळ दोघांच्या बळावरच व्यवसाय पेलला आहे.
सांगली येथे घर घेतले. काही लाख रुपये खर्च करून एक एकरभर शेततळे घेतले. शेतात बंगला बांधला. चार ट्रॅक्टर्स असून दोन कारखान्याच्या सेवेत तर एक मुरघास वाहतूक करतो.
शेती, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून ट्रॅक्टर चालवण्यात देखील कविता यांनी कुशलता मिळवली आहे.