
Pune News : गेल्या दिड एक वर्षापासून राज्यातील राजकीय पक्ष फोडले गेले आहेत. शिवसेनेत ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट पडले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून पक्ष आणि चिन्ह आपल्याचकडे राहावे म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने दाद मागण्यात आली होती. मात्र मंगळवारी (६ रोजी) निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमाणेच निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटास दिले आहे. यामुळे लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान शरद पवार गटाला स्वतंत्र गटाची मान्यता देत नवीन पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडावे असे निर्देश ही आयोगाने दिले आहेत. यामुळे ते आपल्या गटासाठी कोणते नाव आणि चिन्ह निवडतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने धक्कादायक निकाल देताना शरद पवार गटास झटका दिला होता. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्वाळा दिला. यामुळे शरद पवारांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून गेला आहे. तर नवीन नाव आणि चिन्ह लोकसभेच्या आधी शरद पवार गटास घ्यावे लागणार आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह आज दुपारपर्यंत सांगा असे निर्देश दिले आहेत. यामुळे शरद पवार गटाकडून ‘शरद पवार काँग्रेस’, ‘मी राष्ट्रवादी’, ‘शरद स्वाभिमानी पक्ष’ किंवा ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ यापैकी एकाची नवीन नाव म्हणून चाचपणी केली जात होती. तर तर त्यांच्या पक्षाचे नवीन चिन्ह म्हणून चष्मा, कपबशी, ‘उगवता सूर्य’ असू शकते असे म्हटले जात होते.
तसेच शरद पवार गटाने पक्षाचे नाव म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ आणि चिन्ह म्हणून ‘उगवता सूर्य’ निवडल्याचे बोलले जात आहे. तसेच जर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ असे नाव घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच निवडणूकीत शरद पवार गटाला होऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांने मत आहे.
काय झाले वर्षभरापूर्वी
शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षी जुलै महिन्यात फूट पडली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या गटात तब्बल ४१ आमदार आणि २ खासदार गेले होते. तसेच त्यांचा गटाने शिवसेना-भाजपा महायुतीत प्रवेश करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता.
पक्षावर हक्क कुणाचा?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षी फूट पडल्यानंतर पक्षावर हक्क कुणाचा? यावरून जोरदार चर्चा रंगली होती. तर यावरून अजित पवार गट आणि शरद पवार गटात जोरदार रस्सी खेच पाहायला मिळाली. यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. ज्याचा निकाल काल मंगळवारी लागला.
ठरल्या प्रमाणे सूड बुद्धीच राजकारण
दरम्यान या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध केला जात आहे. तर यावरून माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, आमच्या संपर्कात अनेक आमदार आहेत. काही आमदार हे फक्त निधीसाठी अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. ते परत येतील. तर निवडणूक आयोगाचा काल संध्याकाळचा निर्णय हा ठरलेला होता. सगळे ठरल्याप्रमाणे केलं जात आहे. हे सूड बुद्धीच राजकारण सुरू आहे. याच्याआधी शिवसेनेबरोबर हेच झाले. ठाकरेंची शिवसेना शिंदेंना दिली. पण पक्ष कोणी काढला हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. त्यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह हेच शरद पवार आहेत असेही अनिल देखमुख म्हणाले.
हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढा...
दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना आवाहन करत तुमच्यात हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढा असे म्हटले आहे. तसेच हिंमत असेल तर लोकांसमोर जा, मत मागा. अशा पद्धतीने दरोडेखोरी करून पक्ष चोरून राजकारण फक्त काही काळच करता येईल. येत्या काळात हेच तुम्हालाही पाहावे लागेल. याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील असे राऊत यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.