Solapur Agriculture Department : कृषी विभागाची मोठी कारवाई, बोगस खते, बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द

Farmer of Solapur : शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ असे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Solapur Agriculture Department
Solapur Agriculture Departmentagrowon

Agriculture Department Solapur : सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तर आडसाली उसाची लागण केलेल्या शेतकऱ्यांची खते टाकण्यासाठी गडबड सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान खरिपासाठी मोठ्या प्रमाणात बियाणांची विक्री होत आहे परंतु शेतकऱ्यांना मुदतबाह्य खते-औषधे, बियाणांची विक्री, लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाही म्हणून सांगण्याचे प्रकार समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यातील १५ खत दुकानांचा परवाना कायमचा रद्द केला असून दोघांचा परवाना निलंबित केला आहे. राज्यभरातून कृषी विभागाने जूनअखेर बियाणे, खते व कीटकनाशकांचा २५५ मेट्रिक टन साठा जप्त करण्यात केला असून त्याची अंदाजे किंमत अडीच कोटींपर्यंत आहे.

बियाणे, खते या निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी सहायकांच्या निगराणीखाली कृषी सेवा केंद्रांवर त्यांची नियुक्ती करून बियाणे व खतांची विक्री केली जात आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ असे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याठिकाणी आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने भरारी पथकांकडून संबंधित दुकानांची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही पंढरपूरमधील काही कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन त्याठिकाणचा खतांचा साठा पडताळल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Solapur Agriculture Department
Solapur Lok Sabha : सोलापुरात परिवर्तनाच्या चर्चांना उधाण पण दुष्काळाच्या मुद्याला पूर्णविराम, जनतेची नाराजी

परवाने रद्द व निलंबित झालेली जिल्ह्यातील दुकाने

निलंबित करण्यात आलेली दुकाने

बसवेश्वर कृषी केंद्र (कुंभारवेस, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर), मे. एनलायझर ॲग्रोसिस्टमस ओपीसी प्रा. लि (पेहे, ता. पंढरपूर)

परवाना कायमचा रद्द केलेली दुकाने

मे. तेजदिप कृषी केंद्र (अकोले, ता. दक्षिण सोलापूर), समर्थ कृषी केंद्र व सार्थ कृषी केंद्र (दोन्ही होटगी, ता. दक्षिण सोलापूर), जयकल्याण ॲग्रिकल्चर ॲण्ड फर्टिलायझर्स (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवप्रसाद ॲग्रो एजन्सी (रामपूर, ता. दक्षिण सोलापूर), मल्लिकार्जुन कृषी सेवा केंद्र (वडगाव, ता. दक्षिण सोलापूर), समर्थ कृषी केंद्र (बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर), विराज ॲग्रो एजन्सी (वैराग, ता. बार्शी), अंकिता कृषी सेवा केंद्र (संगवी, ता. अक्कलकोट), अंकुर माहिती व कृषी सेवा केंद्र (बरूर, ता. दक्षिण सोलापूर), आदर्श कृषी केंद्र (कुरघोट, ता. दक्षिण सोलापूर), शिवराज कृषी सेवा केंद्र (निमगाव सीना, ता. माढा), माढेश्वरी कृषी सेवा केंद्र (उपळाई, ता. माढा), महासिद्ध ॲग्रो सेंटर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) व आरकाज ऑरगॅनिक कृषी केंद्र (मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com