Animal Fodder : गडहिंग्लज तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध

Green Fodder : गेल्या काही वर्षांत पशुपालकांना चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत होता. गतवर्षीची परिस्थिती तुलनेत बरी होती.
Animal Fodder
Animal Fodderagrowon
Published on
Updated on

Kolhapur News : गेल्या काही वर्षांत पशुपालकांना चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत होता. गतवर्षीची परिस्थिती तुलनेत बरी होती. याचा विचार केला तर चाऱ्याचा प्रश्‍न मिटेल, अशीच यंदाची परिस्थिती आहे. सुक्या चाऱ्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता झाली आहे; तर ओला चाऱ्याबाबतही अच्छे दिन दिसत आहेत. पाऊसमान चांगले झाल्याचा हा परिणाम आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. पशुपालकांना या व्यवसायाचा मोठा आर्थिक आधार आहे. दर दहा दिवसांनी हातात पडणारे दुधाचे बिल संसाराचा गाडा चालविण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहे. अनेकांनी मुख्य व्यवसाय म्हणूनच याकडे पाहिले आहे. गडहिंग्लज तालुक्याचा विचार केला, तर ७० हजारांहून अधिक पशुधन आहे. यावरून दुग्ध व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते.

Animal Fodder
Animal Fodder : शेतकऱ्यांचे चारासंकट टळले

जनावरांना सुक्या व ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फायदा भात पिकाला झाल्याचे दिसून येत आहे. गडहिंग्लज तालुक्यात यंदा सुमारे आठ हजार हेक्टरवर भात पीक घेतले होते. या पिकाला नेमकी गरज असताना पडलेल्या पावसामुळे यंदा उत्पादन चांगले मिळालेच पण, भाताची वाढही चांगली झाली होती.

मळणीनंतर भाताच्या पिंजराचा जनावरांना चारा म्हणून उपयोग केला जातो. गेल्या काही वर्षांत योग्य वेळी पाऊस न झाल्यामुळे त्याची वाढ कमी झाली होती. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. भाताच्या पिंजराबरोबरच गवतही चांगले आले आहे. त्यामुळे सुक्या चाऱ्याचे दर आवाक्यात राहतील, असेच चित्र आहे.

Animal Fodder
Animal Fodder : चारा मुबलक; माळरानातही हिरवळ

दुसरीकडे परतीचा पाऊसही बराच काळ लांबला. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीत त्याचा व्यत्यय आला. पण, या पावसाचा फायदा चाऱ्याच्या उपलब्धतेला होणार आहे. पशुपालकांच्या बांधावरील गवत, जनावरांसाठी लावलेले गाजर गवत कापणीला चांगले आहे.

कडबाही अधिक मिळण्याची आशा

यंदा जमिनीत ओल चांगली असल्याने रब्बी ज्वारीला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. त्याचा कडबा जनावरांना सुका चारा म्हणून वापरतात. तो अधिक प्रमाणात मिळण्याची आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com