Navy Exam : गावात पंक्चर काढणारा तरुण झाला नेव्हीमध्ये भरती

Success Story : कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हराळवाडी (ता. मोहोळ) येथील सूरज मोटे या गावात गाडी पंक्चर काढणाऱ्या तरुणाने नेव्हीच्या परीक्षेत यश मिळवले.
Suraj Mote
Suraj MoteAgrowon
Published on
Updated on

Solapur News : कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हराळवाडी (ता. मोहोळ) येथील सूरज मोटे या गावात गाडी पंक्चर काढणाऱ्या तरुणाने नेव्हीच्या परीक्षेत यश मिळवले. नेव्हीमध्ये एस. एस. आर या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. मोलमजुरी करणाऱ्या आपल्या आई-वडिलांचे स्वप्न त्याने सत्यात उतरवत, सगळ्यांच्याच कौतुकास तो पात्र ठरला आहे.

मोहोळ तालुक्यातील हराळवाडीतील सामान्य कुटुंबातील सूरज महादेव मोटे याचे शिक्षण १२ वी शास्त्र शाखेत झाले आहे. दोन महिन्यापूर्वी सूरजने नेव्हीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताच आला असून, त्यात तो उत्तीर्ण झाला असून, सुरजची नेव्हीं एस.एस.आर यापदी निवड झाली आहे.

या बातमीने हराळवाडीकर ग्रामस्थांमध्ये आनंद झाला असून, गावातील गावकरी व मित्र परिवाराने त्याचा सत्कार केला. सूरजचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण कोरवली येथील देशमुख प्रशाला येथे झाले आहे.

Suraj Mote
Exam Success Story : शेतकऱ्याची मुलगी झाली तंत्र अधिकारी

अशी केली तयारी...

नेव्हीच्या भरतीची तयारी करत सूरज हा त्यांच्या पंक्चर दुकानांमध्ये काम करत होता, पहाटे पाच वाजता उठून सकाळी आठ वाजेपर्यंत तो अभ्यास करायचा, सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत तो दुकान चालू करून पंक्चर काढत बसत होता. टू व्हीलर, ट्रॅक्टर, फोर व्हीलर, तीन चाकी रिक्षा, इत्यादी वाहनाचे पंक्चर सूरज काढत होता.

Suraj Mote
MPSC Success : शेतकऱ्याच्या मुलीने सर केला लोकसेवा आयोगाचा गड

सकाळी ११ ते ५ यावेळेस तो कॉलेजला जात होता. नेव्ही परीक्षेची तयारी सूरज ४ वर्षापासून करत होता, या परीक्षेसाठी सुरजला त्याचे मामा गणेश बामणे यांचे मार्गदर्शन मिळाले. लवकरच सूरज सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी ओडिसाला जाणार आहे.

गेल्या ३-४ वर्षापासून सातत्याने मी तयार करत होतो, त्या कष्टाचे फळ मिळाले, मला आणि माझ्या कुटुंबियाला आनंद झाला, हार न मानता तरुणांनी प्रयत्नामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, यश हे मिळतेच.
- सूरज मोटे, हराळवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com